धरणांत उरला केवळ मृत साठा
By admin | Published: July 3, 2014 09:32 PM2014-07-03T21:32:35+5:302014-07-04T00:11:49+5:30
धरणांत उरला केवळ मृत साठा
Next
इगतपुरी :धरणाचा तालुका अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील दारणा, कडवा, वैतरणा, भावली, मुकणे ही सर्व धरणे मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तुडुंब भरली होती. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी आणि सिंचनासाठी केल्याने ही सर्व धरणे आज कोरडीठाक पडली आहेत. यातील भावली धरणात केवळ चार दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, तर दारणा धरणात 482 द.ल.घ.फू. पाणीसाठा शिल्लक आहे. यातील काही साठा आज चेहडी बंधारा व एम.एल. बंधाऱ्यासाठी केवळ पिण्यासाठी सोडण्यात आले आहे तर मुकणे व कडवा धरणात केवळ मृत साठा शिल्लक आहे.