अवकाळी पावसाच्या नुकसानीचा फक्त अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:19 AM2018-04-14T01:19:02+5:302018-04-14T01:19:02+5:30
जिल्ह्यातील बागलाण व देवळा तालुक्यांत वादळी वारा व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतपिकांचे मोठे नुकसान केले असले तरी, शासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश न देता फक्त नुकसानीचा अंदाज कळविण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्यामुळे शेतकºयांना भरपाई मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व देवळा तालुक्यांत वादळी वारा व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतपिकांचे मोठे नुकसान केले असले तरी, शासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश न देता फक्त नुकसानीचा अंदाज कळविण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्यामुळे शेतकºयांना भरपाई मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळ कांदा काढणीचे काम वेगाने सुरू असून, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव या तालुक्यांतील शेतकरी कांदा काढून तो खळ्यावर साठवून ठेवत आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे भावही कोसळल्यामुळे विक्रीला नेण्यापेक्षा तो चांगला भाव मिळेपर्यंत साठवणुकीवर भर दिला जात असतानाच गुरुवारी दुपारी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने बागलाण व देवळा तालुक्याला तुफान झोडपून काढले. अनेक शेतकºयांचा शेतातील उभा कांदा जमीनदोस्त झाला, तर खळ्यात काढून उघड्यावर ठेवलेला कांदा पावसात भिजून खराब झाला आहे. याशिवाय शेतामध्ये पाणी साचल्याने लागवडीखालील पिकांना किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली असून, विशेषत: भाजीपाला पिकाला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. काही भागातील डाळींब व द्राक्ष पिकांनाही या पावसाचा जोरदार फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नुकसान झालेल्या शेतकºयांच्या शेतमालाचे पंचनामे करण्याचे आदेश देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात फक्त नुकसानीचा अंदाज कळविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. गुरुवारी पावसाने जोरदार झोडपून काढले असले तरी, महसूल खात्याच्या मंडळ कार्यालयात बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रात त्याची नोंद झालेली नसल्यामुळे प्रशासनाच्या लेखी जिल्ह्णात किती पाऊस झाला याची आकडेवारी गोळा करण्यात आलेली नाही. परंतु शासनाने दिलेल्या आदेशानुसार ज्या ज्या भागात अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले त्या भागातील नुकसानीचा अंदाज कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.