बोगस अपंग शिक्षक शोधमोहीम ठरली केवळ फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:43 PM2017-08-24T23:43:13+5:302017-08-25T00:04:00+5:30
जिल्ह्यातील अपंग शिक्षक संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रमाणपत्रानुसार अस्थिव्यंग व दृष्टिदोष असलेल्या अपंगांची सर जेजे हॉस्पिटल व कर्णबधीर असलेल्या अपंगांची अलियावरजंग रुग्णालयातून पडताळणी करावी, असे आदेश दिले होते.
मालेगाव : जिल्ह्यातील अपंग शिक्षक संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रमाणपत्रानुसार अस्थिव्यंग व दृष्टिदोष असलेल्या अपंगांची सर जेजे हॉस्पिटल व कर्णबधीर असलेल्या अपंगांची अलियावरजंग रुग्णालयातून पडताळणी करावी, असे आदेश दिले होते. मात्र तब्बल बारा दिवसांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी यापूर्वी पडताळणी झालेल्या शिक्षकांची पुन्हा पडताळणी करू नये केवळ सक्षम प्राधिकाºयाकडून प्रमाणपत्र तपासून घ्यावे, असे आदेश दिल्यामुळे बोगस अपंग शिक्षकांना पळवाट मिळणार आहे. परिणामी अपंग बोगस शिक्षक शोध हा केवळ फार्स ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
तसेच कर्मचारी अपंग असल्यास त्याच्या सेवापुस्तकात नोंद झाली आहे. महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ५ आॅगस्ट २०१७ रोजी अपंग प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेणाºया शिक्षकांना अपंगत्व पडताळणीसाठी वैद्यकीय मंडळाकडे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १६ आॅगस्ट २०१७ रोजी या आदेशात फेरबदल करण्यात आला. यापूर्वी ज्या शिक्षकांनी अपंगत्व प्रमाणपत्राची पडताळणी केली आहे तसेच त्यांची मूळ सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आली आहे. अशा शिक्षकांनी केवळ सक्षम प्राधिकाºयाकडून प्रमाणपत्राची वैधता तपासून घ्यावी, असे नव्याने आदेश काढले आहेत. या आदेशामुळे बोगस अपंग शिक्षकांना मोठी पळवाट मिळाली आहे. मालेगाव तालुक्यात १ हजार २११ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी १२७ शिक्षक अपंग आहेत. तालुक्यातील १२७ शिक्षक संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. यादीतील काही शिक्षकांनी बोगस अपंग प्रमाणपत्र मिळविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र सक्षम वैद्यकीय अधिकाºयाच्या तपासणी नंतर बोगस अपंग शिक्षक असल्याचे उघडकीस येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या संशयास्पद भूमिकेमुळे अपंग बोगस शिक्षक शोधमोहीम केवळ एक फार्स ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. अपंग बोगस शिक्षकांना प्रशासनाकडूनच अभय दिले जात आहे.