पाणीचोरी रोखली, तरच विसर्ग शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:22 AM2019-04-18T00:22:38+5:302019-04-18T00:22:52+5:30

चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.

Only if we stop water harvesting, it can be possible | पाणीचोरी रोखली, तरच विसर्ग शक्य

पाणीचोरी रोखली, तरच विसर्ग शक्य

Next

भगूर : चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.
चेहेडी आणि लष्करी हद्दीतील बंधाºयातून ज्या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो तेथे आता पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास मंडळ संस्थेने दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केलेली आहे. दुसरीकडे पाणीचोरीच्या प्रकारामुळे बंधाºयातील पाणीसाठी कमी होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागासोबत पाणीवापर संस्थेचे सहकार्याने भरारी पथक नेमले आहे. त्यामध्ये जलसंपदा विभाग पी. एम. कुलकर्णी, आर. जी. सोनवणे, शेख वाणी, नाशिक मनपाचे डी. एल. खेलूकर, ए. टी. यंदे, भगूर पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, रवींद्र संसारे, सिन्नर पालिका मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे डी. जे. सोनजे, महेंद्र कराटे, फकीर उगले, पूर्वा माळी आदींनी चेहेडी ते साउथ देवळाली नदीच्या काठावर सर्व गाव परिसरात पाहणी करून अनेक मोटारी जप्त करून पंप काढण्यात आले. जोपर्यंत पाणी दुष्काळी परिस्थिती आहे तोपर्यंत दिवस-रात्री भरारी पथक कारवाई करत राहणार असल्याने शेतकºयांनी पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार आहे.
दोन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक
जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतर भरारी पथकाने तत्काळ कारवाई करीत अनधिकृत वापर करणाºया शेतकºयांना दणका दिला आहे. त्यांचे कृषिपंप तसेच स्टार्टरदेखील तोडून टाकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दारणा नदी कोरडी आहे, तर नाशिकरोेड, चेहेडी व देवळाली लष्करी बंधाºयात दोन दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असल्यामुळे नाशिक महापालिका, भगूर-सिन्नर नगरपालिका औद्योगिक विकास मंडळासह विविध गावांतील संस्थांनी दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी करताच जिल्हाधिकाºयांनी बैठक घेऊन अनधिकृत वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

Web Title: Only if we stop water harvesting, it can be possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.