नाशिकच्या सिग्नलवरील ‘लेफ्ट टर्न’ नावापुरतेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 09:06 PM2017-08-09T21:06:28+5:302017-08-09T21:08:53+5:30

- अझहर शेख नाशिक, दि. 9 - सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण ...

Only 'left turn' on the signal of Nashik | नाशिकच्या सिग्नलवरील ‘लेफ्ट टर्न’ नावापुरतेच 

नाशिकच्या सिग्नलवरील ‘लेफ्ट टर्न’ नावापुरतेच 

Next

- अझहर शेख

नाशिक, दि. 9 - सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीनस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असून ते एक देखावा ठरत असल्याचे दिसून येत आहे. प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणेदेखील खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात.
शहराच्या सिग्नवरील टायमर मॅनेजमेंट टिकवून ठेवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्याकरिता आणि अत्यावश्यक, अपात्कालिन स्थितीत तत्काळ वाहनांना मार्ग मोकळा मिळण्यासाठी डावी वळणे खुली असणे गरजेची ठरतात. नाशिकच्या सिग्नवरील सर्वच डाव्या वळणांना जणू कायमस्वरुपी अतिक्रमणसह बेशिस्त चालक आणि वाहतूक नियंत्रण शाखेसह महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेचे ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे. कारण सिग्नल ‘लाल’ झाल्यानंतर वाहने थांबण्यास सुरूवात होते. कुठे ५५ तर कुठे ६५ तर कुठे ८५ तर कुठे ९२ सेकंदापर्यंत सिग्नल ‘लाल’ असतो. वाहतुक नियंत्रणासाठी ते आवश्यकही आहे. अशावेळी वाहनांची रांग लागते ही रांग टाळण्यासाठी डावी वळणे खुली राहणे गरजेचे आहे.

{{{{dailymotion_video_id####x8459ur}}}}

जिल्हा रुग्णालयाची वाट व्हावी सुकर.... 
शहरातील प्रमुख सिग्नल ज्यांचा थेट संबंध जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेशी येतो त्या सिग्नलवर तरी किमान डावी वळणे खुली राहतील यासाठी शहर वाहतूक शाखा, महापालिका प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी सिग्नल, त्र्यंबक रोडवरील वन कार्यालयाचा सिग्नल, तरण तलाव सिग्नल, सिडको मार्गावरील उंटवाडी सिग्नल, जेहान सिग्नल, सीबीएस सिग्नल, त्र्यंबकनाका हॉली क्रॉस चर्च सिग्नल, गडकरी चौक सिग्नलच्या चारही डाव्या बाजूंची वळणे सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुली कशी राहतील या दृष्टीने तजवीज करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Only 'left turn' on the signal of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.