मास्कधारक ग्राहकांनाच दुकानात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:05 PM2020-06-29T23:05:14+5:302020-06-29T23:20:47+5:30
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून, तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात असून, अशाप्रकारे आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोनावर मात करण्याची तयारी नाशिककरांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहरातील विविध प्रकारची दुकाने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनिश्चितेचा सामना करीत असताना आता सरकारने दुकाने सुरू ठेवण्यास परवनागी दिल्यानंतर कोरोनाचा सामना करण्याचे मोठे आव्हान व्यावसायिकांसमोर निर्माण झाले आहे. या आव्हानाला सामोर जाताना व्यावसायिकांनी खबरदारीच्या आवश्यक त्या उपाययोजना केले आहेत. दुकानांती वेगवेगळ्या वस्तूंना हाताळण्यापेक्षा विक्रेते स्वतंत्र एकएक वस्तू ग्राहकांना दाखवून त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अनेक दुकानदारांनी, हॉटेलचालकांनी त्यांच्या दुकानाबाहेर फलक लावून ग्राहकांना मास्क लावूनच दुकानात प्रवेश करण्याची सूचना केली असून, दुकानात प्रवेश करतानाच ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर देऊन निर्जंतुकीकरण केले जात आहे.