भालेकर मैदानावर सात मंडळांचा एकच गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:08 PM2020-08-12T23:08:22+5:302020-08-12T23:57:41+5:30

नाशिक : कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून, बी. डी. भालेकर मैदानावरील सात मंडळांनी एकत्र येऊन यंदा एकच गणपतीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे अन्यत्रदेखील गणेश मंडळांनी निर्णय घेतल्यास यंदा कोरोना संसर्ग टाळणे शक्य होणार आहे.

Only one Ganpati of seven circles on Bhalekar Maidan | भालेकर मैदानावर सात मंडळांचा एकच गणपती

भालेकर मैदानावर सात मंडळांचा एकच गणपती

Next
ठळक मुद्देसकारात्मक : कोरोना स्थितीमुळे निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून, बी. डी. भालेकर मैदानावरील सात मंडळांनी एकत्र येऊन यंदा एकच गणपतीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे अन्यत्रदेखील गणेश मंडळांनी निर्णय घेतल्यास यंदा
कोरोना संसर्ग टाळणे शक्य होणार आहे.
यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे उत्सव अत्यंत मर्यादित आणि औपचारिक स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन शासन आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे. भालेकर मैदानावर दरवर्षी सात मंडळे वेगवेगळे गणेशोत्सव साजरा करतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट बघता मैदानावर कोणत्याही स्वरूपाचा देखावा, विद्युत रोषणाई, साउंड सिस्टीमचा वापर न करता एकाच बॅनरखाली गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे मंडळाचे पदाधिकारी गणेश बर्वे व पद्माकर गावंडे यांनी सांगितले.
गणेशभक्तांचा उत्साह दरवर्षीच असतो; परंतु यंदा उत्सव साजरा करता येणार नसला तरी उत्सवाची परंपरा कायम राहावी यासाठी अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आणि त्या उत्सवाच्या बचत होणाऱ्या खर्चातून रक्तदान, शिबिर, सर्वरोगनिदान शिबिर, मास्क वाटप, औषधे वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्याचेदेखील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत ठरवले आहे. या बैठकीस राजे छत्रपती मंडळाचे सचिन रत्ने, महिंद्र सोनाचे राजेंद्र खैरनार, एचएएलचे हेमंत तेलंगी, महेश पगारे, नरहरी राजाचे गौरव बिरारी, मूक बधिरचे सुशांत गालफाडे, यशवंतचे कमलेश परदेशी, मायको बॉशचे संजय पाटील, महिंद्रा मंडळाचे प्रसाद शुक्ल, प्रसाद पंडित आदी उपस्थित होते. इंदिरानगरमध्ये साध्या पद्धतीने होणार गणेशोत्सवकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नासर्डी ते पाथर्डीपर्यंत सर्वांचे आकर्षण ठरणारे गणेशोत्सव उत्सव मंडळ यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करणार आहेत. भाजपप्रणीत युनिक ग्रुपतर्फे यंदा युनिक मैदानावर गणेशोत्सव साजरा न करता राजीवनगर येथील कृतार्थ भवनाच्या प्रांगणात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनवणे यांनी सांगितले. भाजपप्रणीत श्री प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून घरगुती आरास स्पर्धा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून श्री प्रतिष्ठानच्या वतीने नियमावलीचे पालन करण्यात येणार आहे.
प्रभागातील नागरिकांच्या घरगुती गणपतीच्या आरास स्पर्धा घेण्यात येणार आहे. उत्कृष्ट आराससाठी बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे, असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी सांगितले.

Web Title: Only one Ganpati of seven circles on Bhalekar Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.