हजार लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 09:37 PM2020-07-30T21:37:37+5:302020-07-31T01:36:10+5:30

नाशिक : जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी संख्येचा वर्षानुवर्ष असलेला अनुशेष पूर्ण करण्यासाठी आता महानगर, जिल्हा प्रशासनाला धावाधाव करावी लागत आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे दोनवेळा जाहिराती देऊनही कर्मचारी भरती झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात असलेल्या ६१ लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी असलेली शासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार मिळून असलेली ५३७६ ही संख्या हजार कर्मचाºयामागे एकापेक्षाही कमी कर्मचारी अशीच आहे.

Only one health worker per thousand people | हजार लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

हजार लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

Next
ठळक मुद्देकर्मचारी पूर्ततेसाठी ऐनवेळी धावाधाव : वर्षानुवर्ष कर्मचाऱ्यांचा अनुशेष ठेवून आपत्ती कोसळल्यानंतर प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला झाली उपरती

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी संख्येचा वर्षानुवर्ष असलेला अनुशेष पूर्ण करण्यासाठी आता महानगर, जिल्हा प्रशासनाला धावाधाव करावी लागत आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे दोनवेळा जाहिराती देऊनही कर्मचारी भरती झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात असलेल्या ६१ लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी असलेली शासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार मिळून असलेली ५३७६ ही संख्या हजार कर्मचाºयामागे एकापेक्षाही कमी कर्मचारी अशीच आहे.
नाशिकच्या आरोग्य विभागात तसेच जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय महत्त्वाची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद अधिनस्त आरोग्य कर्मचारी यांची २११४ पदे मंजूर असून, त्यापैकी सुमारे ११८४ पदे भरलेली आहेत, तर ९३० पदे रिक्त आहेत. परिणामी नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत आरोग्य कर्मचारी यांच्यावर कामाचा मोठा ताण पडत आहे. कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक व उपचारात्मक बाबींसाठी नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी यांची संवर्ग-१ ची सर्व पदे तसेच जिल्हा परिषद अधिनस्त आरोग्य विभागाची ९३० पदे तत्काळ भरण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील सुमारे २५०० कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के अर्थात ५०० हून अधिक कर्मचाºयांचा अनुशेष कायम आहे. आरोग्य विभागात सध्या जिल्ह्यात ११० डॉक्टर्स, ५४० नर्सिंग, ५५० कर्मचारी, ९५ कार्यालयीन कर्मचारी कार्यरत आहेत. त्याशिवाय राष्टÑीय आरोग्य अभियानाच्या विविध योजनांतर्गत सुमारे १५०० कंत्राटी कामगार आरोग्य विभागात कार्यरत आहेत. नवीन भरतीसाठी केल्या जात असलेल्या प्रकियेला प्रारंभी तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही. आदर्श कर्मचारी संख्येच्या तुलनेत कर्मचाºयांचे प्रमाण अत्यल्प असून, त्याबाबत उपाययोजना केली तरच सर्व यंत्रणांवरील ताण हलका होऊन आरोग्य विभाग सुरळीतपणे चालू शकेल. रिक्त पदांचा पाठपुरावा
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी २११४ पदे मंजूर असून, त्यातील ११८४ पदे सध्या कार्यरत आहेत. आरोग्य विभागातील रिक्तपदांची माहिती शासनाकडे कळविण्यात येऊन ती भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनानेही अलीकडे रिक्त पदे भरण्याची तयारी दर्शविली आहे. पदे रिक्तअसली तरी, राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदे भरून आरोग्य विभाग सेवा देण्यास सक्षम आहे.
- डॉ. कपील आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारीभरतीस प्रतिसाद मिळतोय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भरतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कर्मचाºयांचा अनुशेष लवकरच भरुन निघेल अशी अपेक्षा आहे. सर्व आरोग्य कर्मचारी अत्यंत सक्षमतेने गत चार महिने अव्याहतपणे कार्यरत आहेत. त्यात नवीन कर्मचारी भरती झाल्यास या कर्मचाºयांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होण्यासदेखील मदत होईल.
-डॉ. निखिल सैंदाणे
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Only one health worker per thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.