पहिल्या दिवशी एकच माघार

By admin | Published: February 10, 2016 12:07 AM2016-02-10T00:07:54+5:302016-02-10T00:08:20+5:30

जिल्हा मजूर संघ : सकाळे यांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब

Only one withdrawal on the first day | पहिल्या दिवशी एकच माघार

पहिल्या दिवशी एकच माघार

Next

 नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मंगळवारी (दि. ९) अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी अवघी एक माघार झाली. त्र्यंबकेश्वर तालुका संचालकपदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवारांचे प्रत्येकी चार अर्ज दाखल होते. त्यात संपतराव सकाळे यांचे दोन, तर रोहित संपतराव सकाळे यांचे दोन अर्ज होते. पैकी रोहित सकाळे यांनी काल उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपतराव सकाळे यांची अविरोध निवड झाल्यात जमा आहे.
दरम्यान, काल दिवसभर पेठ तालुका संचालक पदाच्या एका जागेची निवड अविरोध होण्यासाठी दिवसभर बैठका सुरू होत्या. शहरातील कृषीनगर येथील एका कार्यालयात दुपारी पेठ तालुक्यातील संचालकांची एकत्रित बैठक झाल्याचे कळते. तत्पूर्वी आदल्या दिवशी सोमवारी सायंकाळीही पेठ तालुक्यातील संचालकांची बैठक व स्नेहभोजन गंगापूर रोडवरील एका हॉटेलात झाल्याचे समजते. पेठ तालुक्यातून एका जागेसाठी तीन अर्ज असून त्यात निवृत्ती महाले, रामदास भोये व पाडवी यांच्या अर्जांचा समावेश आहे. भोये यांच्यासाठी महालेंनी अर्ज माघारी घेण्यासाठी दिवसभर चर्चेचा ओघ सुरू होता.
तिकडे महाले यांनी माघार घेतली, तरच पाडवीही माघार घेणार असल्याने दिवसभर तिढा कायम होता. पेठ बरोबरच सुरगाणा, कळवण, देवळा, बागलाण व सिन्नर तालुका संचालक पदाच्या निवडणुका अविरोध होण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. एकूण २५१ अर्जापैकी सोमवारी पाच अर्ज बाद ठरविण्यात येऊन २४६ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.
कालपासून (दि.९) २३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २४ फेब्रुवारी रोजी अंतिम नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. ६ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदान घेण्यात येईल. त्याच दिवशी मतदान झाल्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणीस प्रारंभ होईल. जिल्हा मजूर संघाच्या सभासद मतदारांची संख्या ११८९ असून, त्यापैकी ११२९ सभासद मतदानासाठी पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Only one withdrawal on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.