टाकेद तीर्थावर केवळ पोलिसांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:19 PM2021-03-11T22:19:52+5:302021-03-12T00:36:45+5:30
सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वतीर्थ टाकेद येथील महाशिवरात्रीचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. याशिवाय मंदिर बंद ठेवून संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे याठिकाणी पोलिसांशिवाय कुणीही भाविक फिरकला नाही.

जटायू संस्थानचे महंत किशोरदास, गुरू गोदावरीदास वैष्णव व अंबादासजी वैष्णव व अन्य पुजाऱ्यांनी रात्री बारा वाजता श्री भोलेनाथ शिव शंकर यांची मंदिरात विधीवत पूजा केली. मंदिर परिसरात २०० मीटर अंतरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घोटी व अकोले नगर मार्ग, भगूर-नाशिक मार्ग, भरवीर-अडसरे मार्ग या ठिकाणी बॅरिकेटस् लावून रस्ते बंद करण्यात आले होते.
स्वतः पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले(ग्रामीण), घोटी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक गौतम तायडे, टाकेद वासाळी बिटाचे प्रमुख अनिल घुमसे यासह सुमारे पन्नास ते साठ पोलीस कर्मचारी बुधवारपासून तीन दिवस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासोळे, सरपंच ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे, पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड यांनी यापूर्वीच बैठक घेऊन बुधवारचा आठवडा बाजार बंद केला असून तीर्थक्षेत्र परिसरही सील केला होता.