राज्यातील एकमेव बळी मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:23 AM2018-11-08T00:23:36+5:302018-11-08T00:28:59+5:30
आग्रा-मुंबई महामार्गावर नाशिक शहराच्या शिवेवर बळीराजाचे मंदिर आहे. याची एक आख्यायिका आहे. एकदा महालक्ष्मी प्रत्यक्ष बळीराजाला भेटण्यास आली. महालक्ष्मीने बळीराजाकडे काही घेण्याचा आग्रह केला तेव्हा बळीराजाने महालक्ष्मीकडे असा वर मागितला की, जी मंडळी आपल्या घरी तीन दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्या घरी महालक्ष्मी स्थिर होईल. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीने बळीराजाला आपला भाऊ मानून त्याचे औक्षण केले. तेव्हापासून ‘इडापीडा जावो, बळीचे राज्य येवो’ या उक्तीनुसार त्या दिवसाला भाऊबीज असे संबोधले जाऊ लागले. अशा या बळीराजाचे भारतामध्ये दोनच मंदिरे आहेत.
आग्रा-मुंबई महामार्गावर नाशिक शहराच्या शिवेवर बळीराजाचे मंदिर आहे. याची एक आख्यायिका आहे. एकदा महालक्ष्मी प्रत्यक्ष बळीराजाला भेटण्यास आली. महालक्ष्मीने बळीराजाकडे काही घेण्याचा आग्रह केला तेव्हा बळीराजाने महालक्ष्मीकडे असा वर मागितला की, जी मंडळी आपल्या घरी तीन दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्या घरी महालक्ष्मी स्थिर होईल. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीने बळीराजाला आपला भाऊ मानून त्याचे औक्षण केले. तेव्हापासून ‘इडापीडा जावो, बळीचे राज्य येवो’ या उक्तीनुसार त्या दिवसाला भाऊबीज असे संबोधले जाऊ लागले. अशा या बळीराजाचे भारतामध्ये दोनच मंदिरे आहेत. एक महाराष्ट्रात नाशिकमध्ये व एक कर्नाटक राज्यात. नाशिक शहराच्या शिवेवर अलीकडेच नव्याने उभं राहिलेलं मंदिर बळीराजाच्या अस्तित्वाची साक्ष देतं. या मंदिरात पाडव्याच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यानिमित्त बळी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून, बळी महाराज अमर मित्रमंडळाच्या वतीने बलिप्रतिपदा व भाऊबीज उत्सव साजरा करण्यात येतो.
ओझरकडे जाणाºया मार्गावरची नाशिकची शिव म्हणजे बळी महाराज मंदिर. नवीन लग्न झालेली जोडपी शहरात जाताना किंवा येताना श्रीफळ वाढवल्याशिवाय जात नाही. शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाला मंदिराचा अडथळा निर्माण होत होता म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून रासबिहारी शाळेशेजारी असलेल्या सरकारी जागेत मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. अनेक लोकांच्या उदार देणगीतून या ठिकाणी मंदिराची पुनर्उभारणी करण्यात आली. या ठिकाणी गेली ४१ वर्षांपासून सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह या परिसरातील प्रगतिशील शेतकरी वाळूमामा शिंदे, सुनील सूर्यवंशी यांच्या माध्यमातून सुरू आहे.
बळीराजाची कीर्ती सर्व जगात दानशूर म्हणून पसरलेली असल्याने वामन अवतारात येऊन श्री विष्णूने बळीराजाकडे क्षमा याचना करून तीन पावले जमीन मागितली. बळीराजा हे आपल्या संकल्पापासून जरासेही ढळले नाही. त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत तीन पावले जमीन देण्याचा संकल्प सोडण्यासाठी वामन अवतारातील मूर्तीला साकडे घातले आणि श्री विष्णूने आपले खरे रूप प्रकट केले. पहिले पाऊल ठेवताच सर्व पृथ्वी व्यापली, दुसºया पावलाने संपूर्ण स्वर्गलोक व्यापले आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू हे विचारल्यानंतर बळीराजाच्या लक्षात आले की आपल्याकडे परमेश्वराला देण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही त्यामुळे तिसरे पाऊल आपल्या डोक्यावर ठेवण्याची विनंती भगवान श्री विष्णूंना केली. त्यामुळे त्यांना इंद्रपद न मिळता अमरत्व प्राप्त झाले व बळीराजाला संपूर्ण राज्य देऊन स्वत: भगवान श्री विष्णूंनी त्यांच्या महालापुढे द्वारपाल म्हणून उभे राहून त्यांचे रक्षण केले. ज्या दिवशी प्रत्यक्ष महालक्ष्मी बळीराजाला भेटण्यास आल्या त्या दिवसाला भारतीय हिंदू संस्कृतीत बलिप्रतिपदा संबोधू लागले.
अभिजित राऊत