...तरच ग्रामीण भागाचा विकास
By admin | Published: August 26, 2016 12:10 AM2016-08-26T00:10:22+5:302016-08-26T00:11:26+5:30
रवींद्र खताळे : सिन्नर महाविद्यालयात व्याख्यान
सिन्नर : शेतकऱ्यांच्या मुलांना ग्रामीण भागातील समस्या, अडचणींची जाणीव असल्याने त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्यास निश्चितपणे ग्रामीण भागाचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन आयएएस अधिकारी रवींद्र खताळे यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयात आयोजित ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य टी. बी. खालकर, एस. एन. पगार, वाय. एल. भारस्कर, आर. के. मुंगसे आदि उपस्थित होते.
प्राचार्य काळे यांनी प्रास्ताविक केले. सिन्नर महाविद्यालयात लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असून स्पर्धा परीक्षेची दर्जेदार पुस्तके आणि माहिती महाविद्यालयाच्या माय सिन्नर कॉलेज या फेसबुक पेजवर उपलब्ध असल्याचे भारस्कर यांनी सांगितले. (वार्ताहर)