गतवर्षात डेंग्यूचे केवळ तीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:11 AM2021-02-04T00:11:36+5:302021-02-04T00:12:01+5:30

मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यूच्या आजाराकडे मात्र दुर्लक्ष झाले. शहरात गेल्या वर्षभरात केवळ ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले. संपूर्ण वर्षभरात केवळ चार जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात ३ जण डेंग्यूच्या आजाराने बाधित आढळले तर एक जण निगेटिव्ह आढळला.

Only three dengue patients last year | गतवर्षात डेंग्यूचे केवळ तीन रुग्ण

गतवर्षात डेंग्यूचे केवळ तीन रुग्ण

Next
ठळक मुद्देमालेगाव : मागील वर्षात तपासले अवघ्या ४ जणांच्या रक्ताचे नमुने

मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यूच्या आजाराकडे मात्र दुर्लक्ष झाले. शहरात गेल्या वर्षभरात केवळ ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले. संपूर्ण वर्षभरात केवळ चार जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात ३ जण डेंग्यूच्या आजाराने बाधित आढळले तर एक जण निगेटिव्ह आढळला.

२०११ मध्ये ४४ जणांचे रक्ताचे नमुने तपासले होते. त्यात ४ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. दहा वर्षात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण २०१२ मध्ये आढळले होते. २०१२ मध्ये २८० जणांच्या रक्ताची तपासणी केली होती. त्यात ९२ जण बाधित तर १८८ अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतर २०१३ मध्ये १२८ जणांचे रक्ताचे नमुने तपासले. त्यात ४ बाधित रुग्ण आढळले. तर १२४ अहवाल निगेटिव्ह आले. २०१४ मध्ये १८५ जणांचे रक्ताचे नमुने तपासले. त्यात ५४ जण डेंग्यूने बाधित रुग्ण आढळले तर १३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. २०१५ मध्ये ९ जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात ६ जण डेंग्यूने बाधित आढळून आले. २०१६ मध्ये ३६ पैकी ७ जण, २०१७ मध्ये २४ पैकी ७ जण, २०१८ मध्ये ९८ पैकी ४१ जण, २०१९ मध्ये २४८ पैकी ५१ जण तर २०२० मध्ये ४ पैकी ३ जण डेंग्यूने बाधित रुग्ण आढळून आले.
डेंग्यूचा सर्व्हे...

मालेगाव शहरात गेल्या वर्षी कोरोनाचा कहर सुरू होता. त्या मानाने डेंग्यूचे ३ रुग्ण आढळून आले. गेल्या वर्षी २०२० मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील १ हजार ३१ घरांमध्ये जावून सर्व्हे केला. त्यातील केवळ ४ जणांचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले. यात ३ जणांच्या रक्ताचे अहवाल ङेंग्यू पॉझिटिव्ह आले तर एक जण निगेटिव्ह आढळून आला. शहरात महानगरपालिकेच्या १५० आशा वर्कर, ७० आरोग्य सेविका यांनी घरोघरी जावून रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. ते नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले. यात केवळ ३ जण डेंग्यूने बाधित मिळून आले.
काय असतात डेंग्यूची लक्षणे...

डेंग्यूच्या रुग्णांना ताप येतो. सात ते आठ दिवस तो टिकतो.
रुग्णांना डोकेदुखी व अंगदुखीचा त्रास जाणवतो. मळमळ आणि उलट्याही होतात.
डेंग्यूच्या रुग्णाला अंगावर पुरळ येतात व रक्तस्राव होतो.
चवीच्या संवेदनांमध्ये बदल होऊन भूकेचे प्रमाणही वाढते.

सांधेदुखी, स्नायूतील वेदना आणि डोळ्यांच्या मागेही वेदना होतात.

कुठल्या वर्षात किती पेशंट...
२०१६ -७
२०१७ - ७
२०१८- ४१
२०१९- ५१
२०२० - ३

Web Title: Only three dengue patients last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.