वनव्यातील गारवा देणारा खरा मित्र वृक्षच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 11:37 PM2021-08-02T23:37:13+5:302021-08-02T23:41:43+5:30
पिंपळगाव बसवंत : वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्ष हेच खरे मित्र आणि सध्या सोशल मीडियावर गाजणाऱ्या मित्र वनव्यातील गारव्यासारखा म्हणजे खरा मित्र वृक्षच जो आपल्याला तळपत्या उन्हात गारवा देतो, हेच हेरून १ ऑगस्ट रोजी निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायत व बसवंत गार्डन (पूर्वा केमटेक) यांच्या संयुक्त विद्यमाने गावात वृक्षारोपण करून मैत्री दिन साजरा केला आणि वृक्षाबरोबर मैत्रीची गाठ अधिकच घट्ट केली. याप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.

मैत्री दिनानिमित्त गावअंतर्गत ५०० झाडांचे रोपण पूर्ण करून यांनी अनोख्या पद्धतीने मैत्री दिवस साजरा केला.
खरं तर वृक्षांसारखे मित्र कुठेच नाहीत. मित्राप्रमाणे आपण त्याना आपलं केलं तर ते आपल्याला आयुष्यभर जीवनावश्यक ऑक्सिजन, उन्हाळयात थंडगार सावली, आरोग्यदायी फळे, फुले असे खूप काही देतात. त्यामुळे वृक्षारोपण करून साजरा केलेला मैत्री दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला आणि झाडांशी केलेली ही मैत्री आयुष्यभर सगळ्यांना साथ देईल, असे मत मुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी बसवंत गार्डन पूर्वा केमटेकचे व्यवस्थापक संदीप वाघ, अविनाश पवार, मुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल जाधव, उपसरपंच वृषाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य सागर शिंगाडे, शरद गायकवाड, पंकज जाधव, अनिता गांगुर्डे, जयश्री नेहरे, लिलाबाई पाटील, छाया जाधव आदींसह रमेश शेळके, संपत जाधव, सागर जाधव, विष्णू आहेर, विजय पवार, विक्रम जाधव, आशितोष जाधव, दत्तू पवार, सागर शेळके, शरद शेळके, श्रीकांत आहेर, किरण पवार, सुभाष शेळके, गणेश क्षीरसागर, भाऊसाहेब गांगुर्डे, भाऊसाहेब नेहरे, सतीश जाधव, शशिकांत शेळके, सागर शेळके, गेनू शेळके, महिंद्र थेटे, पंकज पवार, ज्ञानेश्वर पवार, कल्पेश पाटील आदींसह ग्रामसेवक कमलेश सावंत आदींसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार
खरंतर मैत्रीसाठी सगळे दिवस खासच असतात. पण, मुखेड गावामधील ग्रामपंचायत प्रशासनाने वृक्षारोपण करून "मैत्री दिन" खूपच खास केला आहे. तसेच दर रविवारी एकत्र येऊन श्रमदान करून एक तास झाडांसाठी देत असतात. मुखेड येथील ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांनी मोठ्या आनंदात व उत्साहात हा दिवस साजरा केला. मुख्य रस्ते, अंतर्गत रस्त्यांना वृक्षारोपण केले.