उन्हाळ कांद्याचे एकमेव वाहन उपबाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 01:14 AM2019-12-12T01:14:45+5:302019-12-12T01:15:07+5:30
वणी : येथील उपबाजार आवारात एकमेव वाहनात विक्रीसाठी आलेल्या उन्हाळ कांद्याला ७४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. १५ क्विंटल कांद्याचे १,११,००० रुपये या कांद्याचे व्यापाऱ्याने अदा केले, तर लाल कांद्याची ५३ वाहनांमधून ३०० क्विंटल आवक झाली.
Next
ठळक मुद्देउत्पादन अपेक्षित नसल्याने दरात तेजीचे वातावरण राहण्याचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील उपबाजार आवारात एकमेव वाहनात विक्रीसाठी आलेल्या उन्हाळ कांद्याला ७४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. १५ क्विंटल कांद्याचे १,११,००० रुपये या कांद्याचे व्यापाऱ्याने अदा केले, तर लाल कांद्याची ५३ वाहनांमधून ३०० क्विंटल आवक झाली. दर कमाल ७२०१ रुपये, किमान ३५११, तर सरासरी ४७७५ रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी झाला. उन्हाळ कांद्याची आवकच नसल्याने चढे दर मिळत आहे. बुधवारी एक वाहन कांदा विक्रीसाठी आला. दरम्यान, लाल कांद्यालाही बाजारभाव असला तरी त्याचेही प्रमाण व उत्पादन अपेक्षित नसल्याने दरात तेजीचे वातावरण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.