भाडेतत्त्वावर घेतलेली इनोव्हा लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:38 AM2018-04-23T00:38:58+5:302018-04-23T00:38:58+5:30
शहरातील पखालरोड परिसरात राहणाऱ्या दोघा संशयितांनी बदलापूर पश्चिम येथील एका नागरिकाची इनोव्हा क्रिस्टा मोटार भाडेतत्त्वावर नोटरी पद्धतीने करार करुन घेतली होती; मात्र चार महिने उलटूनही संबंधितांनी कुठलीही रक्कम न देता मोटार लंपास केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शहरातील पखालरोड परिसरात राहणाऱ्या दोघा संशयितांनी बदलापूर पश्चिम येथील एका नागरिकाची इनोव्हा क्रिस्टा मोटार भाडेतत्त्वावर नोटरी पद्धतीने करार करुन घेतली होती; मात्र चार महिने उलटूनही संबंधितांनी कुठलीही रक्कम न देता मोटार लंपास केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलिसांकडे बदलापूर पश्चिमच्या पोलीस ठाण्याकडून आलेल्या गुन्ह्याप्रमाणे तेथील रहिवाशी मोटारमालक राजेंद्र मारुती आगीवले (४४, रा.साईप्रसाद टॉवर) यांनी सीबीएस परिसरात २० जानेवारी रोजी भाडेतत्त्वाचा करार संशयित फरहाण जिलाणी कोकणी व आवेश जिलानी कोकणी (रा. माशाअल्ला अपार्टमेंट, पखालरोड) यांच्यासोबत केला होता. दरमहा साठ हजार रुपये भाडेतत्त्वाचा करारानुसार आगीवाले यांनी त्यांची इनोव्हा क्रिस्टा मोटार (एम.एच.०५ डीएक्स ५९८३) कोकणी यांनी सोपविली होती. मात्र या संशयितांनी त्यांना अद्याप कुठलीही रक्कम न देता वाहन परत न केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. संशयितानकडे वारंवार रक्कमेची मागणी करूनही त्यांनी रक्कम देण्यास नकार दिल्याने आपली सफवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी संशयितांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक शेळके करीत आहेत.