ओझरला मास्क नसणाऱ्यांची बनसोड यांच्याकडून कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:19 AM2020-07-24T02:19:22+5:302020-07-24T02:19:46+5:30
मास्क नसणाºया नागरिकांची कानउघाडणी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रतिबंधित क्षेत्राची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भेट देत पाहणी केली. त्यांनी सर्वप्रथम सायखेडा फाटा येथे प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अलसना बिल्डिंग, शिवाजीरोड, चांदणी चौक येथे भेटी दिल्या.
ओझर : मास्क नसणाºया नागरिकांची कानउघाडणी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रतिबंधित क्षेत्राची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भेट देत पाहणी केली. त्यांनी सर्वप्रथम सायखेडा फाटा येथे प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अलसना बिल्डिंग, शिवाजीरोड, चांदणी चौक येथे भेटी दिल्या.
तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी रस्त्यावरून जाणाºया नागरिकांना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच स्वछतेबाबत जनजागृती केली. त्यानंतर ग्रामपालिका येथे बनसोड यांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर यांनी केले. तेथे त्यांनी बैठक घेत कोणकोणत्या उपाययोजना सुरू आहेत याबाबत आढावा
घेतला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, डॉ. वैशाली कदम, सर्कल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, अनिल राठी, दिलीप ठुबे, सतीश सोनवणे, जयंत गाडेकर यांच्यासह ग्रामपालिका कर्मचारी उपस्थित होते.