भगवती मंदिराचे दार उघडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 03:44 PM2020-10-13T15:44:23+5:302020-10-13T15:44:29+5:30
शासनाकडे मागणी : भाजपचे गडावर लाक्षणिक उपोषण
कळवण : भाजपच्यावतीने गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे, धार्मिक स्थळे, देवालये उघडावेत याकरिता सातत्याने मागणी करून देखील राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले तरीही निर्णय होत नसल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने सप्तशृंग गडावर देवी मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ लाक्षणिक उपोषण केले. यावेळी नायब तहसीलदार डॉ व्यंकटेश तृप्ते, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दीपिक खैरनार, जेष्ठ नेते सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, निंबा पगार यांच्या नेतृत्वाखाली एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात मदिरेचे बार सुरू केले परंतु मंदिरे बंद असे भयावह चित्र उभे केले. यानिर्णयाविरोधात महाराष्ट्रातील विविध धर्माचार्य, साधुसंत,अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना एकत्र येत आध्यात्मिक आघाडीच्या समन्वयातून राज्यव्यापी उपोषण करण्यात आले असल्याची माहिती माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिली. यावेळी तालुका महामंत्री डॉ अनिल महाजन, सरचिटणीस विश्वास पाटील,एस.के पगार , युवा मोर्चा अध्यक्ष हितेंद्र पगार, हेमंत रावले ,विनायक दुबे प्रकाश कडवे, चेतन निकम, लक्ष्मण कुलकर्णी, राहुल बेनके,मनोहर कदम, माणिक सावंत, अमित दीक्षीत, आकाश बत्तासे,नंदू चित्ते ,प्रकाश मोरे, प्रविण कोतकर,दिनेश राजपूत आदीसह पुरोहित संघ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.