निवडणुका खुल्या करा
By admin | Published: July 20, 2016 12:26 AM2016-07-20T00:26:19+5:302016-07-20T00:35:15+5:30
युवा सेना : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नाशिक : तरुणांमध्ये राजकारणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी व अधिकाधिक तरुणांनी राजकारणाकडे वळावे यासाठी महाविद्यालयीन निवडणुका आवश्यक आहे. त्यामुळे विविध महाविद्यालयांत विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया खुली करण्याची मागणी युवा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षांपासून विविध महाविद्यालयांमध्ये जीएस पदासाठी होणाऱ्या निवडणुका केवळ देखावा आहे. महाविद्यालयीन सचिव, प्राध्यापक, प्राचार्य यांच्याजवळचे विद्यार्थी जीएस होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही. महाविद्यालय प्रशासनाकडून विविध शुल्क आकारून विद्यार्थ्यांची पिळवणूक होते. अशी पिळवणू्क थांबवायची असेल तर महाविद्यालयीन निवडणुका आवश्यक असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या निवडणुकांमार्फत त्यांच्या हक्कांसाठी लढणारा प्रतिनिधी निवडता येणार असल्याने त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. निवासी जिल्हाधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी युवा सेनेचे शहर समन्वयक दीपक चौधरी, किरण घाटोळ, सचिन घाटोळ, अजय पाटील, गोरख नाठे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)