मोकळी मैदाने बनला मद्यपींचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:44+5:302021-04-18T04:13:44+5:30
उपनगरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था नाशिक : शहरातील उपनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी ...
उपनगरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : शहरातील उपनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, परिसरातील नागरिकांनी केली आहे.
उड्डाणपुलाखाली खासगी वाहने
नाशिक : उड्डाणपुलाखाली अनेक खासगी आणि अन्य मालट्रक उभे केले जात असल्याने, प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. द्वारका परिसरातील दोन्ही सर्व्हिस रोडवर गॅरेजची संख्या मोठी असल्याने, तसेच अन्य व्यावसायिक गाळे असल्याने, त्यांची वाहनेही द्वारका उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत उभी केली जातात.
रस्त्यांवर काही ठिकाणी अडथळे
नाशिक : शहरात काही रस्त्यांवर बॅरेकेडिंग, तर काही रस्ते पूर्णपणे मोकळे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांनादेखील कोणत्या रस्त्यांवरून जायचे, कुठे बॅरकेडिंग केले आहे, तेच कळण्यास मार्ग नसल्याने नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे.
वाढत्या उन्हाचा सामान्यांना तडाखा
नाशिक : बहुतांश कामे बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या आणि रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरांना घरीच थांबावे लागत आहे. त्यात वाढत्या उन्हाचे चटके सकाळपासून पत्र्याच्या घरांवर जाणवू लागल्याने आधीच कामाविना बसलेल्या नागरिकांना या उन्हाचा चांगलाच तडाखा बसू लागला आहे.