हरणबारी डावा कालवा पाईपलाईन ऐवजी खुला करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:21 PM2018-12-26T17:21:15+5:302018-12-26T17:21:35+5:30

औंदाणे : हरणबारी डावा कालवा पाईपलाईन ऐवजी खुला करावा अशी मागणी पिंपळकोठे, कातरवेलच्या ग्रामस्थांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Open the Hernabari dawa canal pipeline instead of open it | हरणबारी डावा कालवा पाईपलाईन ऐवजी खुला करावा

हरणबारी डावा कालवा पाईपलाईन ऐवजी खुला करावा

Next
ठळक मुद्देसुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ग्रामस्थांची मागणी

औंदाणे : हरणबारी डावा कालवा पाईपलाईन ऐवजी खुला करावा अशी मागणी पिंपळकोठे, कातरवेलच्या ग्रामस्थांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दोन्ही गांवाच्या क्षेत्रातून हरणबारी डावा कालवा पूर्वीच्या नियोजनानुसार न जाता नवीन शासन निर्णयामुळे पाईपलाईनद्वारे पुर्ण केला गाणार आहे. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र पाण्याशिवाय वंचित राहणार नाही तरी पिंपळकोठे, कातरवेल, दसवेल, शिवारातून जुन्या कातरवेल धरणापर्यंत दोन ते तीन किलोमीटर पर्यंत खुली चारी करावी. सदर चारी भूसंपादनासाठी सर्व भूसंपादन शेतकऱ्यांची संमती आहे असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर अशोक भामरे, हिम्मत भामरे, साहेबराव भामरे, नानाजी भामरे, मधुकर गोसावी, उत्तम भामरे, मधुकर भामरे आदींच्या सह्या आहेत.

(फोटो २६ औंदाणे )
हरणबारी डावा कालवा पाईपलाईन ऐवजी खुला करावा याबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना निवेदनप्रसंगी समवेत पिंपळकोठे व कातरवेल गावातील शेतकरी.

Web Title: Open the Hernabari dawa canal pipeline instead of open it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.