खुली बैठक; प्रदीर्घ चर्चा आणि धावती भेट

By admin | Published: February 17, 2017 12:23 AM2017-02-17T00:23:00+5:302017-02-17T00:23:09+5:30

खुली बैठक; प्रदीर्घ चर्चा आणि धावती भेट

Open meeting; Prolonged discussion and fasting visit | खुली बैठक; प्रदीर्घ चर्चा आणि धावती भेट

खुली बैठक; प्रदीर्घ चर्चा आणि धावती भेट

Next

नाशिक : सकाळी सात वाजता घरातील देवतांचे आणि बाहेर पडल्यानंतर काळाराम मंदिराचे दर्शन. घरी जमलेल्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्यानंतर सकाळी आठ वाजता राजकीय प्रचाराला सुरुवात होते. कार्यकर्त्यांशी चर्चा करतानाच आदल्या दिवशी केलेल्या नियोजनाप्रमाणे आज आपल्याला कुठे कुठे जायचे आहे याची माहिती पक्षाचे शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर आणि वाहनचालकाला दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांचा दिवसभराच्या दौऱ्याला सुरुवात होते.
‘एक दिवस शहराध्यक्षांसमवेत’ हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत बुधवारी (दि. १५) मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल ढिकले यांच्यासमवेत लोकमत प्रतिनिधीने दौरा केला.
ढिकले यांनी बुधवारी प्रथम प्रभाग क्र. चारमधल्या उमेदवारांसोबत परिसरातून प्रचारफेरी काढली येथील कार्यकर्त्यांशी हितगुज साधल्यानंतर मखमलाबाद येथे आयोजित केलेल्या प्रचार फेरी आणि बैठकीसाठी मखमलाबादच्या कार्यकर्त्यांचे फोन येतात आणि गाडी मखमलाबाद गावात पोहचले. गावात पोहचल्यानंतर गावातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मखमलावाद बसस्थानकातील मंदिराच्या प्रांगणात बैठक सुरू होते. या बैठकीदरम्यान अभ्यंकर प्रभागातील नागरिकांना मार्गदर्शन करत असाताना एकीकडे राहुल ढिकले कार्यकर्त्यांना जवळ घेत खांद्यावर हात ठेवतात आणि शुक्रवारी (दि. १७) राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेबाबत ‘गुफ्तगू’ करतात.दुपारी पक्ष कार्यालयात पोहचल्यानंतर कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद होतो. ढिकले वहिनींच्या हातचा स्वयंपाक केलेल्या डब्यातील पातोड्याची आमटी आणि रव्याच्या खिरीचा आस्वाद घेत काही क्षण विसावतात.
४प्रचाराच्या व्यस्ततेत सकाळच्या सत्राचा कामटवाडे येथील प्रचार आटोपून राहुल ढिकले आणि अविनाश अभ्यंकर नवीन सीबीएस येथील पक्ष कार्यालयाकडे रवाना होतात. रवाना होत असतानाच अभ्यंकर पक्ष कार्यालयात फोन करतात आणि घशात ‘इन्फे क्शन’ झाल्याने पिण्यासाठी गरम पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देतात.दिवसभरात किमान सात ते आठ प्रभागात तरी प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ढिकले मखमलाबादहून थेट इंदिरानगरला येतात. त्यानंतर अंबड गाव, कामटवाडे परिसरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी भेटी होतात.

Web Title: Open meeting; Prolonged discussion and fasting visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.