आपसातील वाद मिटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:21 PM2019-10-03T23:21:28+5:302019-10-03T23:26:17+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे बंद असलेला चव्हाण वस्ती ते जेजूरकर वस्तीपर्यंतचा शिवार रस्ता ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश कातकाडे यांनी संबंधित शेतकºयांच्या समविचार बैठकीतून सोडविला. कातकाडे यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याबरोबर त्याची दुरुस्तीदेखील केल्याने नायगाव खोºयात या शुभ वर्तमानाची चर्चा होत आहे.

Open for road traffic, eliminating conflicts | आपसातील वाद मिटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला

आपसातील वाद मिटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला

Next
ठळक मुद्देनायगाव : शेतकऱ्यांच्या समविचार बैठकीतील निर्णय

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे बंद असलेला चव्हाण वस्ती ते जेजूरकर वस्तीपर्यंतचा शिवार रस्ता ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश कातकाडे यांनी संबंधित शेतकºयांच्या समविचार बैठकीतून सोडविला. कातकाडे यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याबरोबर त्याची दुरुस्तीदेखील केल्याने नायगाव खोºयात या शुभ वर्तमानाची चर्चा होत आहे.
गावाच्या उत्तर भागातील गोदावरी काठावर शेतकºयांच्या प्रमाणात वस्त्या आहेत. चव्हाण, जेजूूरकर, नाठे व खालकर या शेतकºयांना एकमेव जुना सावळी हा शिवार रस्ता सुरू होता. मात्र गेल्या तब्बल पंधरा वर्षांपासून हा रस्ता शेतातील बांधावरून शेतकºयांच्या झालेल्या वादामुळे बंद पडला होता. त्यामुळे या परिसरातील शेकडो शेतकºयांना शेतमाल व दळणवळणासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. आजपर्यंत अनेकांनी रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणालाच यात यश आले नाही. परिणामी भांडणाचा त्रास होत होता. सरपंच नीलेश कातकाडे यांनी पंधरा वर्षांचा वाद कायमचा मिटावा यासाठी खुल्या झालेल्या रस्त्याची स्वखर्चाने डागडुजी करून हा रस्ता शेतकºयांना वाहतुकीस मोकळा केला.गेल्या पंधरा वर्षांपासून
हा शिवार रस्ता शेतकºयांच्या आपसातील वादांमुळे बंद होता. त्यामुळे या वस्त्यावर राहणाºया इतर शेतकºयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. परिसरातील शेतकºयांना शेतमाल विक्र ीसाठी घेऊन जाणे जिकिरीचे झाले होते. वाद असलेल्या शेतकºयांची समजूत काढून हा रस्ता सुरू करण्यात मला यश आल्याचा मला आनंद होत आहे.
- नीलेश कातकाडे,
सरपंच, नायगाव

Web Title: Open for road traffic, eliminating conflicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.