सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी खुले करा, अन्यथा गाव दत्तक घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:48 PM2020-07-21T21:48:46+5:302020-07-22T00:59:15+5:30
सप्तशृंगगड : येथील सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी खुले करा, अन्यथा गाव दत्तक घ्या, अशी मागणी मंगळवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी देवस्थानकडे केली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यात सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ब्रेक लागला. या पार्श्वभूमीवर गडावरील चैत्रोत्सव यात्राही रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
सप्तशृंगगड : येथील सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी खुले करा, अन्यथा गाव दत्तक घ्या, अशी मागणी मंगळवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी देवस्थानकडे केली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यात सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ब्रेक लागला. या पार्श्वभूमीवर गडावरील चैत्रोत्सव यात्राही रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
लॉकडाऊन शिथिल होईल या आशेवर व्यावसायिक होते; परंतु लॉकडाऊन कमी न होता वाढतच गेल्याने जवळ असलेली जमापुंजी खर्च होऊन गेली आाहे. कर्जाचा डोंगर वाढतच गेला. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याकारणाने येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. येथे व्यवसायाव्यतिरिक्त कुठलाही शेती व्यवसाय नसल्याने हातावर पोट असलेल्यांची व व्यावसायिकांची चिंता वाढल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सप्तशृंगीदेवी मंदिरावर येथील अर्थचक्र अवलंबून आहे. मंदिर बंद असल्याने स्थानिक दोनशे ते तीनशे तरुणांनी कामानिमित्त स्थलांतर केले आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे मंदिर खुले करण्यात यावे अन्यथा पहिली पायरी येथे भगवतीची प्रतिमा स्थापित करून दर्शन सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ व व्यावसायिकांनी केली. संस्थानचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून देवी संस्थानाकडून याबाबत संबंधित प्रशासनाला आदेश करण्यात यावे, याविषयी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह नेरकर यांना निवेदन देण्यात आले.
-----------------
पाच महिन्यांपासून दर्शन बंद
सप्तशृंगगड देवस्थानचा प्रशासनाने विचार करून मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अन्यथा देवस्थानने गाव दत्तक घ्यावे, अशी संतप्त प्रतिक्रि या ग्रामस्थांतर्फे व्यक्त केली जात आहे. त्याचअनुषंगाने ग्रामस्थांनी व देवी संस्थानचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर व जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांना बोलावून भवानी चौकात एकत्र जमून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून देवी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
----------------
लॉकडाऊन झाल्यापासून सप्तशृंगगड कडकडीत बंद आहे. येथे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून फक्त व्यवसायच आहे. नाशिक, मुंबई, पुणे यासारखी मोठे शहर अनलॉक केली. सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राकडे प्रशासनाने लक्ष द्यावे तसेच देवी संस्थानने मंदिर खुले करण्यासाठी पाठपुरावा करावा.
- अजय दुबे, अध्यक्ष,
व्यापारी संघटना
---------------
गावाची लोकसंख्या तीन ते चार हजार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे गावातील सर्व दुकाने व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाल्याने गावाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाल्याची स्थिती आहे. मंदिर खुले करावे, अन्यथा संस्थानने गाव दत्तक घ्यावे.
- राजेश गवळी, उपसरपंच
---------------------
कोरोनामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सप्तशृंगगड लॉकडाऊन असल्यामुळे येथील व्यावसायिकांची वाईट परिस्थिती झाली आहे. पालकमंत्री व तहसीलदार यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे सकाळी ९ ते ५ या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.
- संदीप बेनके, सामाजिक कार्यकर्ते