वंचित तरुणाईला कृतिशील करणारे मुक्त विद्यापीठ मार्चमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:58 PM2018-01-11T23:58:31+5:302018-01-12T01:35:49+5:30

संजय पाठक । लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राजकारण, बदलती आलिशान लाइफ स्टाइल, सोशल मीडिया यात अडकलेल्या युवा पिढीच्या पलीकडे असाही वर्ग आहे की, ज्याची जगण्याची धडपड वेगळी आणि विषयही वेगळे आहेत. अशा युवकांसाठी ही परिस्थिती अनुरूप नसली तरी ती बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ शकते. त्यांना ज्ञानातून त्यांच्या अंगीभूत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी भाषा आणि संस्कृतीतज्ज्ञ तसेच विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी अनोखा मार्ग शोधला आहे. विचारांची देवाण- घेवाण करणारे अनोखे मुक्त विद्यापीठ तयार होणार असून, पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळा ढाचा असणारे हे विद्यापीठ एका ठिकाणी नसेल आणि कोण एक कुलपती, कुलगुरूही नसेल. शासनाच्या मान्यतेशिवाय स्थापन झालेले हे समाजमान्य विद्यापीठ असणार आहे. या नवोेपक्रमाची पायाभरणी संतभूमी महाराष्टÑातच होणार असून, येत्या मार्च महिन्यात त्याची घोषणा होणार आहे.

 Open University in the month of March for the unruly youth! | वंचित तरुणाईला कृतिशील करणारे मुक्त विद्यापीठ मार्चमध्ये!

वंचित तरुणाईला कृतिशील करणारे मुक्त विद्यापीठ मार्चमध्ये!

googlenewsNext

संजय पाठक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राजकारण, बदलती आलिशान लाइफ स्टाइल, सोशल मीडिया यात अडकलेल्या युवा पिढीच्या पलीकडे असाही वर्ग आहे की, ज्याची जगण्याची धडपड वेगळी आणि विषयही वेगळे आहेत. अशा युवकांसाठी ही परिस्थिती अनुरूप नसली तरी ती बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ शकते. त्यांना ज्ञानातून त्यांच्या अंगीभूत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी भाषा आणि संस्कृतीतज्ज्ञ तसेच विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी अनोखा मार्ग शोधला आहे. विचारांची देवाण- घेवाण करणारे अनोखे मुक्त विद्यापीठ तयार होणार असून, पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळा ढाचा असणारे हे विद्यापीठ एका ठिकाणी नसेल आणि कोण एक कुलपती, कुलगुरूही नसेल. शासनाच्या मान्यतेशिवाय स्थापन झालेले हे समाजमान्य विद्यापीठ असणार आहे. या नवोेपक्रमाची पायाभरणी संतभूमी महाराष्टÑातच होणार असून, येत्या मार्च महिन्यात त्याची घोषणा होणार आहे.
दक्षिणायन या संस्थेच्या माध्यमातून दक्षिणेत आणि आता महाराष्टÑातही युवकांच्या भावभावना समजावून घेणाºया डॉ. गणेश देवी यांनी सद्यस्थितीचे विवेचन करून युवकांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ शहरी, सोशल मीडियात गुरफटलेला तरुण हे आजच्या नव्या पिढीचे साकारले जाणारे चित्र. कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या मागे घोषणा देत, कधी त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत ऐन उमेदीची वर्षे वाया घालवणारी पिढी भानावर येते तेव्हा काही करण्यासावरण्याची वेळ निघून गेलेली असते. त्याशिवाय नवीन व्यसने, सोशल मीडिया, व्हर्च्युअल जगात वावरणारी आजची पिढी असे एक चित्र दिसून येते, परंतु समाजातील असाही युवा वर्ग आहे जो राजकारण, व्यवस्था, अपुरी साधनसामग्री आणि मूलभूत विषयांसाठीच संघर्ष करतो आहे. त्यांचे प्रश्न हे फार वेगळे आहेत, त्यांच्याकडे राजकारण- सोशल मीडियासाठी वेळ नाही. मात्र शिक्षण-रोजीरोटीसाठी रोजच लढाई करावी लागत आहे अशांचा आवाज ऐकण्यासाठी आणि त्यांचा जाहीरनामा ऐकून घेण्यासाठी डॉ. गणेश देवी यांनी आधी कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्टÑातही युवकांशी गटचर्चा ऐकून त्यांचा जाहीरनामा तयार करण्याचे काम हाती घेतले. अन्य राज्यांतही त्याची तयारी सुरू आहे. त्यातून युवा पिढीच्या माध्यमातून व्यवस्था किंवा सुविधांमध्ये बदल करण्यासाठी त्यांना राजकारण, चळवळी यापेक्षा वेगळा मार्ग शोधला आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. चळवळी किंवा राजकारण हा मार्ग अनुसरणाºयांना माझा नकार नाही, मात्र शिक्षणातून ही स्थिती बदलता येऊ शकते, या विषयावर मी अनेक वर्षांपासून अभ्यास करीत आहे, त्यातून लोकमान्य विद्यापीठाची नवी संकल्पना माझ्या डोक्यात घोंगावत होती. आता राज्यातील ठिकठिकाणी असलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर त्याची गरज आणि उपयुक्तता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे विचारांचे आणि ज्ञानाचे मुक्त विद्यापीठ असेल, परंतु त्याला कायद्याच्या चाकोरीचे आणि परंपरेचे बंधन नसेल. त्याचे एक ठिकाण नसेल तर गावागावांत ते असेल. गावातील सुजाण नागरिक आणि अभ्यासक त्याचे नियंत्रण करतील. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेला कोणीही त्यात ज्ञानार्जन करू शकेल, त्यामुळे त्याला वयाचे आणि किमान शिक्षणाचे बंधन नाही. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माधयमातून पुस्तके या वंचितांपर्यंत पोहोचवता येईल. यात भूगोल- इतिहास नाही. उथळपणाने विरोध नाही की कोणत्या विचारांचे समर्थन नाही. स्वातंत्र्य, समता, संस्कृती, अभिव्यक्ती, पर्यावरण संतुलन असे विचारशील आणि कृतिशील शिक्षण असेल. अशा या वेगळ्या विद्यापीठाची घोषणा येत्या मार्च महिन्यात करण्यात येणार आहे. महाराष्टÑातील विचारांची मशागत संतांनी केली आहे. यामुळे अशाप्रकारचे मुक्त शिकवण आणि प्रबोधन करणारे हे लोक विद्यापीठ यशस्वी होईल, असा विश्वासही डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला आहे.

Web Title:  Open University in the month of March for the unruly youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक