साहित्य संमेलनासाठी मुक्त विद्यापीठाचे ‘मुक्तद्वार’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:34+5:302021-02-09T04:16:34+5:30

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य ...

Open University's 'open door' for Sahitya Sammelan! | साहित्य संमेलनासाठी मुक्त विद्यापीठाचे ‘मुक्तद्वार’ !

साहित्य संमेलनासाठी मुक्त विद्यापीठाचे ‘मुक्तद्वार’ !

Next

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य राहील. निमंत्रित पाहुण्यांच्या निवासासह अन्य आवश्यक ती सर्व सुविधा संमेलनासाठी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी साहित्य संमेलन आयोजन समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

याबाबत माहिती देताना जातेगावकर म्हणाले, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे भूषण आहे. येत्या साहित्य संमेलनासाठी मुक्त विद्यापीठासारखी सशक्त आणि लोकाभिमुख संस्था आयोजकांना सहकार्य करण्यासाठी भक्कमपणे पाठीशी उभी रहावी, यासाठी संमेलन आयोजकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू वायुनंदन यांची भेट घेऊन संमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली. नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन ही नाशिककरांच्या दृष्टीने आणि तमाम महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद घटना असून, या साहित्याच्या महोत्सवात विद्यापीठ सक्रिय सहभाग नोंदवेल आणि आयोजनात सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच ही केवळ संधी नसून आमची जबाबदारीही आहे, अशी ग्वाही कुलगुरू वायुनंदन यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, संजय करंजकर, विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे समन्वयक सचिन शिंदे, विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाचे सहयोगी सल्लागार दत्ता पाटील उपस्थित होते.

Web Title: Open University's 'open door' for Sahitya Sammelan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.