युरिया शेतकऱ्यांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:22 PM2020-07-08T21:22:06+5:302020-07-09T00:33:15+5:30
लोहोणेर : देवळा तालुक्यात युरियाचा तुटवडा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने साठेबाज खतविक्रेत्यांवर कारवाई करत रास्त भावात शेतकºयांना युरिया उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.
लोहोणेर : देवळा तालुक्यात युरियाचा तुटवडा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने साठेबाज खतविक्रेत्यांवर कारवाई करत रास्त भावात शेतकºयांना युरिया उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.
देवळा तालुक्यात युरिया खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. खेड्यापाड्यात शेतकरी खतांच्या दुकानात चकरा मारत असून, गरजू शेतकºयांना मका, बाजरी, तूर, भुईमूग इत्यादी पिकाकरिता कोळपणी केल्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा द्यावी लागते. म्हणून शेतकरी खतांच्या दुकानात चकरा मारत असून, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून देवळा तालुक्यात कुठेही युरिया मिळत नसल्याने शेतकºयांनी कृषिमंत्री दादा भुसे व संबंधित खात्यांकडे तक्रार दाखल करून शेतकºयांना मदत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार देवळ्याचे तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी प्रशांत पवार यांनी तातडीने कारवाई केली. लोहोणेर गावात रासायनिक खतांच्या दुकानामध्ये धाडी टाकून खंत विक्रेत्यांकडे युरियाचा साठा करून ठेवला होता. कृषी विस्तार अधिकारी प्रशांत पवार यांनी व गावातील सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार व इतर शेतकºयांसमोर पंचनामा करून गरजू शेतकºयांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करून दिला.
देवळा तालुक्यात अधिक युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने कुबेर जाधव, कृष्णा जाधव, दशरथ पूरकर, शशिकांत निकम, दुश्यंत पवार, अमर जाधव, बापू देवरे, संजय सावळे, योगेश आहेर आदींनी केली आहे.
--------------------
लोहोणेर गावातील तीनही खत विक्रे त्याकडे सकाळी चौकशी केली असता कुणाकडेही युरिया
शिल्लक नसल्याचे
सांगितले जात होते. म्हणून कृषी विस्तार अधिकारी पवार यांच्याकडे शेतकºयांनी तक्रार केली.