सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:11 AM2018-02-05T01:11:20+5:302018-02-05T01:12:05+5:30

नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेस रविवारी (दि. ४) उत्साहात प्रारंभ झाला.

The opening of the Balatatta Tournament organized by the public library Nasik | सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेस प्रारंभ

सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेस प्रारंभ

Next
ठळक मुद्देपरशुराम साईखेडकर नाट्यगृहात प्रारंभ दीपप्रज्वलन करून या स्पर्धेस सुरुवात

नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेस रविवारी (दि. ४) उत्साहात प्रारंभ झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अखिल भारतीय नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम व कार्यवाह सुनील ढगे यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून या स्पर्धेस सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, गिरीश नातू, प्रकाश वैद्य, गीता बागुल, सोमनाथ मुठाळ आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. कदम यांनी परशुराम साईखेडकर नाट्यगृहाने अनेक अभिनेते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, रंगमंच सजावटकार, रंगभूषाकार घडविले असल्याचे सांगितले. बालनाट्य स्पर्धेसाठी सतीश वाणी, पद्मा सोनी व मीना वाघ यांच्यावर परीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रास्ताविक गिरीश नातू यांनी केले. शंकरराव बर्वे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सविता कुशारे यांनी केले.
पहिल्या दिवसाचे प्रयोग
बालनाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आजोबांची शाळा, डे केअर सेंटर शाळेने शहाणपण देगा देवा, रचना विद्यालयाने वन-वे आणि शिशुविहार व बालकमंदिर शाळेने घडलंय-बिघडलंय या नाटकांचे सादरीकरण केले.

Web Title: The opening of the Balatatta Tournament organized by the public library Nasik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.