लोकार्पण : सिनेअभिनेत्यांच्या उपस्थितीत

By Admin | Published: December 28, 2016 01:13 AM2016-12-28T01:13:24+5:302016-12-28T01:13:39+5:30

नूतनीकृत ‘बॉटनिकल गार्डन’ नाशिककरांसाठी खुलेराज यांच्या पाठीशी नाना !

Opening: In the presence of cine stars | लोकार्पण : सिनेअभिनेत्यांच्या उपस्थितीत

लोकार्पण : सिनेअभिनेत्यांच्या उपस्थितीत

googlenewsNext

नाशिक : मनसेला यंदाची निवडणूक कठीण असल्याची चर्चा असली तरी प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर यांनी मात्र ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दाखवले आहे. पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या वनौषधी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राज यांच्या कल्पक कार्यशैलीचे कौतुक करतानच लोकांना इतर पक्ष अजमावू दे, शेवटी राज यांचीच सत्ता असेल, असे आश्वस्त केले.
नाशिक महापालिका आणि टाटा ट्रस्टच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या ३२ एकर परिसरातील वनऔषधी उद्यानाच्या लोकार्पण सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभापती सलीम शेख, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, राहुल ढिकले, टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे आदि उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांच्या हस्ते वनऔषधी उद्यानाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उद्यानाच्या भव्यतेविषयी बोलताना राज ठाकरे यांनी केलेल्या नवनिर्माणाचे कौतुक केले. ते म्हणाले की, असे उद्यान राज्यातील इतर शहरात कुठेच नाही. आता नाशिककरांवर त्यांची देखभालीची जबाबदारी आहे. खरे तर राज हे नेहमीच उत्कृष्ट कलाकृती साकारण्यात प्रयत्नशील असतात. मला इतर राजकीय पक्षांविषयी माहीत नाही. मात्र राज याच्या संकल्पनेतून साकार होणारी वास्तू विशेष असते. त्यामुळे इतरही शहरांमध्ये त्याची सत्ता यावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच लोकांना इतर पक्ष आजमावू दे, कारण सरतेशेवटी सत्ता राज यांच्याकडेच येईल, असेही नाना पाटेकर म्हणाले.
यावेळी त्यांनी शहीद जवानांविषयी बोलताना म्हटले की, १६ वर्षांत जे घडले नाही ते गेल्या आठ दिवसांमध्ये घडले. आपले ३०३ जवान शहीद झाले असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मिझोराम, अरुणाचल या राज्यांमध्ये चार शाळा उभारण्यात याव्यात, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून केली गेली. जेव्हा मी ही गोष्ट राज याला सांगितली तेव्हा त्याने लगेचच आपण शाळा उभारूयात असे म्हटले. राजा यांचा हाच स्वभाव मला भावला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी वनऔषधी उद्यानाच्या नूतनीकरणात योगदान दिलेल्या वनविभाग महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रवीण चव्हाण, टाटा ट्रस्टचे दीपशिख सुरेंद्रन, स्नेहा डिजलकर, विराज डावरे, संजय डापके, सुभाष टकले, पंकज इसनगर आदिंचा सत्कार केला. यावेळी मनसेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Opening: In the presence of cine stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.