सिडकाेत लाेकसहभागातील कोविड सेंटर कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:44+5:302021-04-19T04:13:44+5:30
कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी महापालिकेच्या मदतीने साकारलेले हे कोविड सेंटर म्हणजे लोकसहभागाचा नवा पॅटर्न ...
कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी महापालिकेच्या मदतीने साकारलेले हे कोविड सेंटर म्हणजे लोकसहभागाचा नवा पॅटर्न असल्याचे मत यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
सिडकोतील कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना महापालिका आणि अन्य खासगी रुग्णालयांत उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याने लोकसहभागातून सिडकोत दोन ठिकाणी ६५ खाटांच्या कोविड सेंटरचे काम सुरू केल्याचे सुधाकर बडगुजर यांनी यावेळी सांगितले. नजीकच्या मनपा शाळेत १०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येणार असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे, असेही बडगुजर यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, दत्ता गायकवाड, मनपा गटनेते विलास शिंदे, मामा ठाकरे, राहुल ताजनपुरे, देवानंद बिरारी, योगेश बेलदार, नगरसेवक श्यामकुमार साबळे, भागवत आरोटे, रत्नमाला राणे, हर्षदा बडगुजर, किरण गामणे, संगीता जाधव आदी उपस्थित होते
फोटो ओळी : आर फोटोवर १८ सिडको बडगुजर नावाने...
सावतानगर येथील बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरचे लोकार्पण करताना कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बबनराव घोलप, विजय करंजकर, हेमंत गोडसे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, मामा ठाकरे, राहुल ताजनपुरे, बाबा गायकवाड, देवानंद बिरारी आदी.
===Photopath===
180421\18nsk_34_18042021_13.jpg
===Caption===
सावता नगर येथील बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर चे लोकार्पण करतांना कृषिमंत्री दादा भुसे समवेत बबनराव घोलप, विजय करंजकर, हेमंत गोडसे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, मामा ठाकरे, राहुल ताजनपुरे, देवानंद बिरारी आदी.