जलवाहिनी व विहिरी खोदकामास शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 06:02 PM2019-05-03T18:02:11+5:302019-05-03T18:02:23+5:30
मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात पाण्यावरुन संघर्ष उभा राहू लागला आहे. पाटणे, चिंचावड शिवारातील गिरणा नदीपात्रात विहीर खोदून बाहेरगावी जलवाहिनीद्वारे पाणी उपसा करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात पाण्यावरुन संघर्ष उभा राहू लागला आहे. पाटणे, चिंचावड शिवारातील गिरणा नदीपात्रात विहीर खोदून बाहेरगावी जलवाहिनीद्वारे पाणी उपसा करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत तहसीलदार चंद्रसिंग राजपूत यांची भेट घेवून संतप्त शेतकऱ्यांनी जलवाहिनी कामास कुठल्याही शेतकºयाला परवानगी देवू नये, अशी मागणी करीत निवेदन सादर केले. तहसीलदार राजपूत यांनी टंचाई काळात जलवाहिनी कामास परवानगी दिली जाणार नसल्याचे आश्वासन शेतकºयांना दिले.
तालुक्यातील पाटणे, आघार बु।। व चिंचावड शिवारातील गिरणा नदीपात्रात व नदीकाठावर बाहेरगावातील शेतकºयांनी जमिनी घेवून विहीर खोदकाम सुरू केले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पाईप लाईन करुन पाणी उपसा केला जात आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूला १०० ते दीडशे विहिरी आहेत. दत्त के. टी. वेअर बंधाºयाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातो.