डॉक्टरांना औषधनिर्मिती, संशोधनात करियरच्या संधी : डॉ.रश्मी हेगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 04:12 PM2018-03-02T16:12:14+5:302018-03-02T16:12:14+5:30
फार्मासिट्युकल इंड्रस्ट्रीमध्ये क्लिनिकल ट्रायल ,संशोधन आणि निर्मिती या क्षेत्रात डॉक्टरांना करियरच्या मोठ्या संधी असून डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग या क्षेत्रात झाला तर विविध आजारांवर आणखी प्रभावकारी औषधें तयार होतील, असे प्रतिपादन बालरोग तज्ञ् आणि अबॉट इंडियाच्या वैद्यकीय संचालक डॉ. रश्मी हेगडे यांनी केले आहे.
नाशिक : फार्मासिट्युकल इंड्रस्ट्रीमध्ये क्लिनिकल ट्रायल ,संशोधन आणि निर्मिती या क्षेत्रात डॉक्टरांना करियरच्या मोठ्या संधी असून डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग या क्षेत्रात झाला तर विविध आजारांवर आणखी प्रभावकारी औषधें तयार होतील, असे प्रतिपादन बालरोग तज्ञ् आणि अबॉट इंडियाच्या वैद्यकीय संचालक डॉ. रश्मी हेगडे यांनी केले आहे.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अव्दितीय वार्षिक स्नेहसंमेलनात डॉ. रश्मी हेगडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले , संचालक सचिन पिंगळे, प्रल्हाद गडाख, भाऊसाहेब खताळे , डॉ. प्रशांत देवरे , दत्तात्रय पाटील आदि उपास्थित होते. प्रारंभी डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्व्लन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी विनोद पाटील याने विद्यार्थी उपक्रमाचा अहवाल सादर केला. तर मेजर डॉ. जितेंद्र सिंग यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचा पुस्तके-ग्रंथभेट देत सत्कार करण्यात आला. बहुजन हिताय , बहुजन सुखाय या प्रमाणे डॉक्टरांनी उत्तम आरोग्य सुविधा प्रत्येक घटकापर्यंत पोहचवावी, असे आवाहन यावेळी मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी केले तर सरचिटणीस नीलिमा पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असून डॉक्टर आणि विद्यार्थी यांनी दर्जेदार व उत्तम आरोग्य सेवा रुग्णांना दयावी असे आवाहन केले. याप्रसंगी शैक्षणिक वर्षात एमबीबीएस परीक्षा ,वैद्यकीय संशोधन , क्रीडा , कला , विविध स्पर्धा यात विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी ,शिक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले- "अव्दितीय-२०१८" या महोत्सवातील गीत गायन, नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमास विद्यार्थी , विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.