ग्रामीण तरुणांना संधीचे पंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 06:06 PM2019-06-14T18:06:38+5:302019-06-14T18:07:26+5:30
मिलिंद वाघ : मोहाडीत करिअरविषयक मार्गदर्शन
दिंडोरी : ग्रामीण भागातील तरु णांमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे, त्यांना संधीचे पंख आहेत. गरज आहे ती फक्त त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची. आज देशात कुठल्याही क्षेत्रात ग्रामीण भागातील तरु ण चांगले यश मिळविताना दिसत आहे, हे यश मिळविण्यासाठी त्यांनी व्यक्त होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. मिलिंद वाघ यांनी केले.
मोहाडी येथे सह्याद्री फार्मस्च्यावतीने मोहाडी क्लसटर अंतर्गत करिअर मार्गदर्शन शिबीरात मिलिंद वाघ यांनी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी व पालक यांचेशी संवाद साधला. यावेळी सह्याद्री फार्मस्चे विलास शिंदे, रामेतीचे प्राचार्य सुनील वानखेडे, प्रा. महेश शेलार टीसीएसचे संदीप शिंदे, प्रा. एस. व्ही. खैरनार आदि मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रा. एस व्ही खैरनार यांनी १० वी आणि १२ वी नंतरच्या प्रवेश प्रक्रि या याविषयी सविस्तर माहिती देताना त्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी यावर भाष्य केले. कट आॅफ, कॉलेजची निवड करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. प्रा. महेश शेलार यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील माहिती देताना अडचणींना समोरे कसे जायचे याविषयी मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रि या,कृषी विद्यापीठातील विविध शाखांची माहिती तसेच कृषी संशोधनातील संधी त्यातून निर्माण होणारे रोजगार यावर प्राचार्य सुनील वानखेडे यांनी संवाद साधला. संदीप शिंदे यांनी समजातील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यातून अर्थार्जन कारण्यासाठीच्या उपलब्ध संधी यावर मार्गदर्शन केले. विलास शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुरेश नखाते यांनी केले.