पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 04:35 PM2019-08-25T16:35:06+5:302019-08-25T16:39:03+5:30
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वषार्साठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नूकसाण टळले आहे. विशेष म्हणजे विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियाही अजून सुरू असल्याने पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार उपलब्ध जागेवर प्रवेश मिळविणे शक्य होणार आहे.
नाशिक : बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वषार्साठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नूकसाण टळले आहे. विशेष म्हणजे विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियाही अजून सुरू असल्याने पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार उपलब्ध जागेवर प्रवेश मिळविणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या सततच्या शैक्षणिक धोरणामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रियेला दिरंगाई झाली असून ही दिरंगाई पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या प्रारंभीच्याच काळात आॅनलाईन प्रवेश प्रणालीत तांत्रिक अडचणी उद्भवल्याने पारंपरिक विद्याशाखांसह व्यावसायिक शाखांतील पदवी व पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असून या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे. यंदा सर्वच व्यावसायिक शाखांच्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाला आहे. राज्यातील पूरस्थितीचा फटकाही प्रवेशप्रक्रियेला बसला असून अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुक्त विद्यापीठासह विविध स्वायत्त महाविद्यालयांमधील शिक्षणक्रमांनाही प्रवेश घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.