दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्णांसाठी मंगळवारपासून प्रवेशाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 06:12 PM2019-09-02T18:12:35+5:302019-09-02T18:20:23+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल झाले असून, या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांवर प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी मंगळवार (दि. ३) पासून प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल झाले असून, या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांवर प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी मंगळवार (दि. ३) पासून प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातही दोन वर्षांपासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, यावर्षी प्रवेशप्रक्रियेतील तीन नियमित आणि एक विशेष फेरी झाल्यानंतर ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ अशा एकूण पाच फेºयांमध्ये जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.३०) जाहीर झाला असून, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे पुन्हा एकदा प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी राबविली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, दि. ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका घेऊन प्रवेश अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतरच दि. ९ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
सात हजार जागा उपलब्ध
शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अजूनही सहा ते सात हजार जागा उपलब्ध असून, त्या जागांवर पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा घसरल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत कमी होती. त्यामुळे पुरवणी परीक्षेसाठी २५ हजार विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यातील सहा हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांना अकरावीसाठी प्रवेशाची अंतिम संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
अशी होईल प्रवेशफेरी
पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दि. ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान माहिती पुस्तिका घेऊन त्यानुसार प्रवेश अर्ज करता येणार असून, दि. ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान महाविद्यालयांना राखीव कोट्याच्या रिक्त जागा समर्पित करावी लागणार आहे. त्यानंतर उपलब्ध रिक्त जागांवर दि. ९ सप्टेंबरपासून ६० टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, तर १३ सप्टेंबरपासून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्याची संधी मिळणार असून, दि. १३ ते १४ सप्टेंबरदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. १६ सप्टेंबरला एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना कॉलेज निवडण्याची संधी दिली जाणार असून, दि. १६ ते १७ सप्टेंबर दरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे.