जेईई मेनच्या अर्जात ३१ जुलैपर्यंत दुरुस्तीची संधी ; दोन परीक्षा एकाच दिवशी आल्याने पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:46 PM2020-07-27T17:46:28+5:302020-07-27T17:52:08+5:30

आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनटीएकडून घेतली जाणारी जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. परंतु, ६ सप्टेंबरला यूपीएससीच्या माध्यमातून घेतली जामारी एनडीए अ‍ॅण्ड एन ए परीक्षाही नियोजित असल्याने एनटीएकडून जेईई परीक्षार्थींना जेईई परीक्षेच्या अर्जात ३१ जुलैपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जेईईला प्रविष्ट विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, यूपीएससीद्वारे घेतली जाणारी एनडीएची परीक्षा देणे शक्य होणार आहे.

Opportunity to amend JEE Main application till 31st July; Option since two exams come on the same day | जेईई मेनच्या अर्जात ३१ जुलैपर्यंत दुरुस्तीची संधी ; दोन परीक्षा एकाच दिवशी आल्याने पर्याय

जेईई मेनच्या अर्जात ३१ जुलैपर्यंत दुरुस्तीची संधी ; दोन परीक्षा एकाच दिवशी आल्याने पर्याय

googlenewsNext
ठळक मुद्देजेईई व एनडीएची परीक्षार्थींना दिलासाजेईईच्या परीक्षा अर्जात दुरुस्तीची संधीदोन्ही परीक्षा 6 सप्टेंबरला एकत्र आल्याने पर्याय

नाशिक : राष्ट्रीय स्तरावरीवर आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनटीएकडून घेतली जाणारी जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. परंतु, ६ सप्टेंबरला यूपीएससीच्या माध्यमातून घेतली जामारी एनडीए अ‍ॅण्ड एन ए परीक्षाही नियोजित असल्याने एनटीएकडून जेईई परीक्षार्थींना जेईई परीक्षेच्या अर्जात ३१ जुलैपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जेईईला प्रविष्ट विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, यूपीएससीद्वारे घेतली जाणारी एनडीएची परीक्षा देणे शक्य होणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने एनटीएनने हा निर्णय घेतला असून, संकेतस्थळावर याविषयीची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
एनटीएनमार्फत अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतली जेईई मेन परीक्षा व यूपीएससीची एनडीए अ‍ॅण्ड एनए या महत्त्वाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी वेळी होणार आहेत. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जेईई मेनच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांनी जेईई मेन आणि यूपीएससीची एनडीए एनए या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केला असेल, तर त्यांना जेईई मेनच्या अर्जात तशी माहिती नमूद करावी लागणार आहे. अर्जात सुधारणा करण्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली असून, जेईई मेनच्या संकेतस्थळावर त्याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जे विद्यार्थी यावर्षी जेईई मेन परीक्षा देत आहेत आणि यूपीएससी एनडीए एनए परीक्षादेखील देत आहेत त्यांच्यासाठीच ही संधी देण्यात आली आहे. दरम्यान, मे महिन्यातील जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये ही परीक्षा होत आहे. जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत होणार आहे. यूपीएससी एनडीए एनए परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. अर्थात दोन्ही परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचा यामुळे गोंधळ उडू शकतो. म्हणूनच जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी तशी माहिती जेईई मेन-२०२० परीक्षेच्या अर्जात नमूद करण्याच्या सूचना एनटीएकडून करण्यात आली आहे.  

Web Title: Opportunity to amend JEE Main application till 31st July; Option since two exams come on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.