एम.एड सीईटीसाठी अर्जाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:07 AM2019-03-21T00:07:47+5:302019-03-21T00:08:11+5:30
बी.एड. सीईटी परीक्षेनंतर आता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.एड या शिक्षणक्रमासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
नाशिक : बी.एड. सीईटी परीक्षेनंतर आता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.एड या शिक्षणक्रमासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बी.एड सीईटी परीक्षा ८ व ९ जून रोजी होईल. तर एम.एड सीईटी परीक्षा ३१ मे रोजी होणार आहे. त्यासाठी २६ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देणे अनिवार्य असते. प्रवेशपरीक्षेविना प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एम.एडला प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी सीईटी परीक्षेला अर्ज करणे आवश्यक आहे. सीईटी परीक्षेसाठी डी.एड किंवा कोणतीही पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी प्रवेश अर्ज करू शकतील.
बी.एडच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या सीईटीसाठी अर्ज करू शकतील. सर्वसाधारण संवर्गासाठी १००० रुपये तर राखीव संवर्गासाठी ५०० रुपये शुल्क आहेत. एम.एड अभ्यासक्रम लवकरच तीन वर्षांचा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रवेशाची संधी विद्यार्थ्यांसाठी असेल.