‘नेट’ साठी २ मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:39 AM2021-03-01T00:39:19+5:302021-03-01T00:40:23+5:30
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेली नेट २ मेचे ७ मे आणि १० ते १७ मे या कालावधीत घेतली जाणार असून, या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना २ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेली नेट २ मेचे ७ मे आणि १० ते १७ मे या कालावधीत घेतली जाणार असून, या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना २ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून यावर्षी २ मे २०२१ पासून ऑनलाइन पद्धतीने नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) घेतली जाणार आहे. यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ही परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सीबीएसईला देण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील सर्वच महत्त्वाच्या परीक्षांचे आयोजन एनटीएतर्फे केले जात आहे.