नाशिकच्या विश्वेशने साधला व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 02:39 PM2018-10-07T14:39:31+5:302018-10-07T14:50:49+5:30
जुलै २०१८ साली इराण येथे झालेल्या इंटरनॅशनल बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याला रौप्यपदक राखण्यास यश मिळाल्याने त्याच्या या यशाची दखल घेत एकप्रकारे भारत सरकारकडून त्याला बहुमानच देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स पुतिन यांची भेट घेऊन संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.
नाशिक : भारतभरातून दहा विद्यार्थ्यांची निवड रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्यानिमित्त वैज्ञानिक प्रदर्शनासाठी करण्यात आली होती. यामध्ये नाशिकच्या विश्वेश मिलिंद भराडिया या विद्यार्थ्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व पुतिन यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. हा क्षण प्रेरणादायी व आत्मविश्वास वाढविणारा होता, अशा भावना विश्वेशने व्यक्त केल्या.
दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्समधून (एम्स)विश्वेश एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत. जुलै २०१८ साली इराण येथे झालेल्या इंटरनॅशनल बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याला रौप्यपदक राखण्यास यश मिळाल्याने त्याच्या या यशाची दखल घेत एकप्रकारे भारत सरकारकडून त्याला बहुमानच देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स पुतिन यांची भेट घेऊन संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.
रशियाचे अध्यक्ष पुतिन व मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा क्षण मला खूप काही शिकवून गेला. ही भेट अविस्मरणीय अशीच आहे. संशोधन व नवकल्पनांविषयी पुतिन व मोदी यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन आयुष्यभर उपयुक्त ठरणारे असेच आहे. २१ वे शतक हे बायोलॉजीच्या संशोधनाला वाव देणारे असणार आहे, असे पुतिन यांनी यावेळी सांगितले.