धोंडगे यांची सेवानिवृत्ती मूलभूत लेखनासाठी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:18+5:302021-07-05T04:11:18+5:30

दृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. अध्यक्षीय मनोगतात डॉ. ...

Opportunity for Dhondge's Retirement Basic Writing | धोंडगे यांची सेवानिवृत्ती मूलभूत लेखनासाठी संधी

धोंडगे यांची सेवानिवृत्ती मूलभूत लेखनासाठी संधी

Next

दृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोरे यांनी डॉ. धोंडगे यांनी केलेल्या मूलभूत संशोधनाविषयी मांडणी करताना त्यांचे अनेक पैलू उलगडून दाखवले. यावेळी माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. रमेश वरखेडे, कवयित्री नीरजा, डॉ. विद्यागौरी टिळक यांनी डॉ. दिलीप धोंडगे यांच्या ४४ वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल गौरवोद्‌गार काढले. यावेळी प्रा. व्ही. एम. पवार यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. एकनाथ पगार यांनी केले, तर प्रा. राजेश झनकर यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. प्रकाश शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमात बाबा भांड, डॉ. चंद्रकांत पाटील, भास्कर हांडे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अविनाश सप्रे, डॉ. सतीश बडवे, दासू वैद्य तसेच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक अभ्यासक सहभागी झाले होते.

Web Title: Opportunity for Dhondge's Retirement Basic Writing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.