शिवकालीन शस्त्रे जाणून घेण्याची संधी

By Admin | Published: March 10, 2017 12:50 AM2017-03-10T00:50:06+5:302017-03-10T00:50:17+5:30

सिन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांना समजावून घ्या. त्यांचा अभ्यास करा. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून प्रेरणा घ्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांनी केले.

An opportunity to learn the weapons of Shiva | शिवकालीन शस्त्रे जाणून घेण्याची संधी

शिवकालीन शस्त्रे जाणून घेण्याची संधी

googlenewsNext

 सिन्नर : महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना समजावून घ्या. त्यांचा अभ्यास करा. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून प्रेरणा घ्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांनी केले.
सिन्नर सार्वजनिक वाचनालयात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रकाश वाजे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर नगराध्यक्ष किरण डगळे, पुंजाभाऊ सांगळे, मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, इतिहास संशोधक गिरीश जाधव, अ‍ॅड. शिवाजी देशमुख, नारायण वाजे, मंगला शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
वाजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळविण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यामागची तपश्चर्या याचा इतिहास सांगताना समाजात वावरताना छत्रपतींच्या आचार-विचारांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मनोगत व्यक्त केले. शिव इतिहास संशोधक गिरीश जाधव यांनी प्रदर्शनात मांडलेल्या शिवकालीन शस्त्रांची माहिती दिली. गुरुवार (दि. ९ मार्च ) ते रविवार (दि. १२) पर्यंत सिन्नर सार्वजनिक वाचनालयात शस्त्र प्रदर्शन सिन्नरकरांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.
महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची ओळख सिन्नरकरांना व्हावी, शस्त्रांच्या माध्यमातून त्यावेळचा इतिहास उलगडला जावा याकरिता आमदार वाजे यांच्या संकल्पनेतून सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात २०० हून अधिक शस्त्रे मांडण्यात आली आहेत. यात मराठा, मुघल, राजपूत तलवार, मराठा धोप, पट्टा, समशेर खंडा, पदकुंत, अश्वकंत, गजकुंत आदि प्रकारातील भाले, मराठा कट्यार, चामड्याच्या कातडीपासून तयार केलेल्या ढाली, शमशेर, पोलादी भाला, तोफ, गोळे, मुठींंचे विविध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारची वाघनखे आदि शस्त्रे मांडण्यात आली आहे.
यावेळी उपनराध्यक्ष प्रमोद चोथवे, पंकज मोरे, विजय जाधव, शैलेश नाईक, गीता वरंदळ, सुजाता तेलंग, सोमनाथ पावसे, ज्योती वामने, प्रतिभा नरोटे, संग्राम कातकाडे, सदस्य सुमन बर्डे, भगवान पथवे, सुनील चकोर, जितेंद्र जगताप, मु. शं. गोळेसर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: An opportunity to learn the weapons of Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.