प्रस्थापितांचे घोंगडे झटकून नवोदितांना संधी

By किरण अग्रवाल | Published: October 27, 2019 01:25 AM2019-10-27T01:25:21+5:302019-10-27T01:31:00+5:30

छगन भुजबळ, दादा भुसे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर व नरहरी झिरवाळ या विद्यमानांचे निकाल दृष्टिपथात होतेच; पण याखेरीजच्या अन्य मातब्बरांना धक्के देत मतदारांनी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना चपराक लगावली आहे. दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे व मौलाना मुफ्ती यांना ‘कम बॅक’ करण्याची संधी त्यातूनच लाभून गेली.

Opportunity for newcomers by shaking their heads | प्रस्थापितांचे घोंगडे झटकून नवोदितांना संधी

प्रस्थापितांचे घोंगडे झटकून नवोदितांना संधी

Next
ठळक मुद्दे उमेदवार किंवा त्यांच्या पक्षांचाच नव्हे, तर हा मतदारांचाही विजयगृहीत धरणाऱ्यांना  आणले जमिनीवरकोणी कितीही म्हटले तरी यंदाची निवडणूक एकतर्फी नाही

सारांश
पक्षांतरे असोत, की उमेदवारी; मतदारांना गृहीत धरून राजकीय पक्षांकडून घेतले जाणारे निर्णय प्रसंगी कसे ठोकरून लावले जाऊ शकतात याचा पुन:प्रत्यय याही निवडणुकीत येऊन गेला आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत प्रस्थापित उमेदवारांना नाकारत नवोदितांना मुंबईत पाठविले गेल्याचे निकाल तेच सांगून जाणारे आहेत.
कोणी कितीही म्हटले तरी यंदाची निवडणूक एकतर्फी नाही, हे याच स्तंभात वेळोवेळी निदर्शनास आणून दिले गेले होते. तरी काही उमेदवार आपल्याला स्पर्धाच नसल्याच्या आविर्भावात वावरत होते. सत्ताधारी भाजप-शिवसेना या पक्षांची तर आपण ठरवू ती पूर्व दिशा, अशीच वाटचाल होती. त्यातून भरघोस प्रमाणात पक्षांतरे तर घडून आलीच, शिवाय जनमानसाचा अंदाज न घेता; अगर त्यांना गृहीत धरून उमेदवाºया दिल्या गेल्या. त्याचा फटका संबंधिताना बसला. जिल्ह्यातील नऊ विद्यमान आमदारांना पराभवास सामोरे जाण्याची वेळ आल्याचे पाहता, वातावरण जर खरेच सत्ताधाºयांना अनुकूल राहिले असते तर असे घडले असते का, असा साधा प्रश्न यातून उपस्थित होऊ शकणारा आहे. कारण, यात विरोधी पक्षांच्या उमेदवारांखेरीज सत्ताधारी पक्षांचे अनिल कदम, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप व निर्मला गावित यांचाही समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कळवण-सुरगाण्यातील जे.पी. गावित, देवळालीतील घोलप व नांदगावमधील पंकज भुजबळ हे जिल्ह्यातील त्या त्या पक्षातील मातब्बर व प्रस्थापित उमेदवार होते. गावितांनी आजवर त्यांचा लालगड अभेद्य राखला होता, तर घोलपांनीही तब्बल तीन दशके एकहाती वर्चस्व राखलेले होते. पण मतदारांच्या मानसिकतेतील बदलाचा विचार करून स्वत:त बदल न केल्याने त्यांना जनतेनेच घडविलेल्या बदलाला सामोरे जावे लागले. नांदगावात पंकज भुजबळ व नाशिक पूर्वमध्ये बाळासाहेब सानप थांबू शकले नाहीत, त्यामुळे मतदारांनी त्यांना थांबवले. इगतपुरीमध्ये तर काँग्रेसच्याच तिकिटावर लढल्या असत्या तर निवडून येण्याची शक्यता अधिक राहिलेल्या निर्मला गावित यांनी शिवसेनेत जाऊन शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या या प्रयत्नावर मतदारांनी पाणी फिरवले. म्हणजे, वर्षानुवर्षांपासून काम करणाºयांना पक्षाकडून डावलले जाणे जसे मतदारांना रुचले नाही, तसे केवळ सत्तेच्या छावणीत जाऊ पाहण्याचे प्रयत्नही पटले नाही हेच निकालावरून लक्षात यावे.
अर्थात, निफाडमध्ये अनिल कदम यांची विजयाची हॅट्ट्रिक हुकण्यामागे मतविभाजनाचे प्रमुख कारण दिसून येते, तर नांदगावमध्ये सुहास कांदे यांच्या विजयासाठीही हाच फॅक्टर कारणीभूत ठरला. सर्वाधिक उत्कंठेची लढत ठरलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांना मिळालेला विजयही मतविभाजनातूनच साकारल्याचे स्पष्ट आहे. येथे एकाच मतदारसंघात अनेकांनी बळ आजमावणी केली. त्यातून मतांचे विभाजन होऊन पक्षीय बांधिलकीतून लाभलेली मते व गत पाच वर्षातील काम आणि संपर्कामुळे सीमा हिरे यांचा विजय सुकर ठरून गेला. हे होत असताना ज्या जागेसाठी संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी राजीनामास्र उगारून प्रतिष्ठा पणास लावली तेथे मात्र सेना बंडखोराला मतदारांनी तब्बल पाचव्या क्रमांकावर ठेवल्याची बाब या पक्षासाठीच नाचक्कीदायी ठरली.
एक बरे झाले, प्रस्थापिताना ठोकरताना मतदारांनी नवीन चेहºयांना संधी देत राजकीय प्रवाहावरील शेवाळ दूर करण्याचा प्रयत्न केलेलाही दिसून आला. देवळालीतील सरोज अहिरे या तर तब्बल ५८ टक्केपेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या आहेत, तर ज्यांना कुणी जमेत धरले नव्हते त्या इगतपुरीतील कॉँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनीही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकची मते मिळवून आपला विजय नोंदविला. बोलून दाखविल्या जाणाºया लाटेपेक्षा सुप्त लाट कशी उलथापालथ घडवते, ते या दोन्ही ठिकाणी पहावयास मिळाले. कळवणमध्ये धडपडी व पित्याचा सर्वसमावेशक राजकारणाचा वारसा चालवू पाहणाºया नितीन पवार या तरुणाला पसंती लाभली, तर नाशिक पूर्वमध्येही त्याच पद्धतीने म्हणजे पित्याच्या पावलावर पाऊल ठेवणाºया अ‍ॅड.राहुल ढिकले यांना पहिल्या प्रयत्नातच मतदारांनी समर्थन दिले. नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी स्वप्नपूर्ती साधली. हे पाचही नवीन चेहरे यंदा जिल्ह्याला लाभले. शिवाय, बनकर, कोकाटे, बोरसे व मौलानांचे ‘कम बॅक’ झाल्याने सहाही विद्यमानांसह हे सारे नवे-जुने मिळून मतदारांची अपेक्षापूर्ती साधतील, अशी आशा करूया...

Web Title: Opportunity for newcomers by shaking their heads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.