दहावी व बारावीच्या अनुत्तीर्णांना उत्तीर्ण होण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:10 AM2019-07-16T01:10:38+5:302019-07-16T01:11:22+5:30
दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार असून, राज्य शिक्षण मंडळातर्फे बुधवारपासून (दि.१७) पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.
नाशिक : दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार असून, राज्य शिक्षण मंडळातर्फे बुधवारपासून (दि.१७) पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक विभागातून या परीक्षेला एकूण ३९ हजार ४९४ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात दहावीच्या २४ हजार ९२६, तर बारावीच्या १४ हजार ५६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे १७ ते ३० जुलैदरम्यान दहावीची, १७ जुलै तर ३ आॅगस्ट दरम्यान बारावीची आणि १७ ते ३१ जुलै दरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनाही पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असल्याने नाशिक जिल्ह्यातून दहावीचे ११ हजार ४६० व बारावीचे ८०९२ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले असून, धुळ्यातून दहावीचे ३ हजार ५८५ व बारावीचे २ हजार ४६, जळगवामधून दहावीचे ६ हजार ९४१ व बारावीचे २ हजार ८४८ तर नंदुरबारमधून दहावीसाठी २ हजार ९९३ व बारावीसाठी एक हजार ५८२ असे एकूण ३९ हजार ४९४ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होणार आहे.
दहावीचे २४ हजार ९२६, बारावीचे १४ हजार ५८६ विद्यार्थी