निर्यात शुल्क वाढीचा विरोध; NCPच्या शरद पवार गटानं रस्त्यावर फेकला कांदा, नाशिक-पुणे मार्गावर रास्ता रोको
By संजय पाठक | Published: August 23, 2023 03:21 PM2023-08-23T15:21:36+5:302023-08-23T15:22:41+5:30
नाशिक जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. त्यामुळे निर्यात शुल्क वाढीची झळ या जिल्ह्याला बसणार असून हेच निमित्त करून राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत.
नाशिक- केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवल्यामुळे नाशिक जिल्ह्यात कांदा पेटला असून कांदा लिलाव बंद आहेत. तसेच ठिकठिकाणी आंदोेलने केली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने आज सकाळी नाशिक पुणे मार्गावर आंदेालन करून रस्ता रोखून धरला, त्याच बरोबर रस्त्यावर कांदा फेकून आंदोलन केले.
नाशिक जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. त्यामुळे निर्यात शुल्क वाढीची झळ या जिल्ह्याला बसणार असून हेच निमित्त करून राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट राज्य सरकारात सामिल असला तरी शरद पवार गट बाहेर आहे. त्यामुळे या विषयावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने नाशिक शहराजवळ शिंदे पळसे येथे नाशिक पुणे मार्ग रोखण्यात आला. यावेळी कांदा फेकण्यात आले.
यावेळी निर्यात शुल्क कमी करावे, तसेच कांद्याला चार हजार रूपयांचा हमी भाव द्यावा यासह विविध मागण्या करण्यात करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.