विकासकामांसाठी कर्जास विरोध करणे हा असंमजसपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:58+5:302021-01-17T04:13:58+5:30
शहरात विकासकामे करण्यासाठी कर्ज काढण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. ...
शहरात विकासकामे करण्यासाठी कर्ज काढण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजय बेारस्ते यांनी टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना महापौरांनी बोरस्ते यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे.
कोरोनामुळे मुळातच महापालिकेचे उत्पन्न घटले आहेत. त्यातच कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागल्याने अन्य मूलभूत कामे झालेली नाही. केवळ महापालिकेचे उत्पन्न वाढावे व महसुलात वाढ व्हावी याकरिता आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या नागरिकांना वसुलीसाठी सक्ती करणे कितपत योग्य होणार आहे याचेही उत्तर बोरस्ते यांनी द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
इन्फो..
सर्वच प्रभागात कामे करणार
विकासकामांसाठी कर्ज काढल्यानंतर त्यातून होणारी कामे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील करण्यात येणार आहे. कारण भाजपने नागरी कामांबाबत कधीच पक्षपात केलेला नाही, असे स्पष्ट करताना दत्तक पित्याने नाशिकसाठी काय काय केले आहे हे निओ मेट्रो प्रकल्प व पीपीपी तत्त्वावरील शिवाजी स्टेडियम येथील वाहनतळाबाबतचा प्रकल्प वर्षभरापासून जाणीवपूर्वक रखडवून ठेवणाऱ्यांनी विचारू नये, असेही महापौरांनी सुनावले आहे.