विरोधकांकडूनच दाभाडीला पाणी देण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:19 AM2017-08-01T01:19:54+5:302017-08-01T01:19:58+5:30

दाभाडीला मालेगाव मनपाच्या तळवाडे साठवण तलावातून पाणी देण्यास विरोध करणाºयांनीच सत्तेत असताना मार्चमध्ये तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार पाणी देण्याबाबत महासभेत ठराव मंजूर केला होता, अशी माहिती महापौर शेख रशीद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Opposition also gave a resolution to give water to Dabhade | विरोधकांकडूनच दाभाडीला पाणी देण्याचा ठराव

विरोधकांकडूनच दाभाडीला पाणी देण्याचा ठराव

Next

आझादनगर : दाभाडीला मालेगाव मनपाच्या तळवाडे साठवण तलावातून पाणी देण्यास विरोध करणाºयांनीच सत्तेत असताना मार्चमध्ये तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार पाणी देण्याबाबत महासभेत ठराव मंजूर केला होता, अशी माहिती महापौर शेख रशीद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गत महासभेत दाभाडी गावास पाणी देण्यास मनपाच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. याबाबत माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल व बुलंद एकबाल यांनी मंगळवारी (२५) पत्रकार परिषद घेवून विरोध दर्शवित ‘त्या’ ठरावास विखंडित करण्याची लेखी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात येवून या निर्णयास शहराच्या विरोधात असल्याचे आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषद घेतली. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेचा सहउदाहरण आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला. आज दुपारी महापौर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती देत ठरावाची प्रत पत्रकारांना दिली. महापौर शेख म्हणाले की, आजचे विरोधक काल सत्तेत असताना ७ मार्च २०१७ रोजी ठराव क्र. १८४ नुसार यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती. आज समाजाचा पुळका दाखविणारे तेव्हा झोपा काढत होते का? असा सवाल केला. शहरातील मुस्लिम समाजाचे सहानुभूती दाखविणाºयांनी प्रथम आत्मपरिक्षण करावे. माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांच्या आमदार पदाचा कार्यकाळात शहरात चणकापूर धरणातून येणाºया पाण्याचे एका आवर्तनास मुकावे लागले आहे. दिवंगत नेते निहाल अहमद यांनी सात वेळा निवडून येत मंत्री, विरोधी पक्षनेते अशी महत्वाची पदे भूषविली. तेव्हा शहरास व मुस्लिम समाजासाठी स्मरणात राहणारे एक तरी काम केले आहे का? असा सवाल त्यांनी केला. याउलट माझ्या आमदाराच्या कार्यकाळातच गिरणाधरण पाणीपुरवठा योजना पुर्णत्वास आली. त्यास दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे व दौलतराव आहेर यांनी विरोधी पक्षात राहून मोठे सहकार्य केले होते. आज निहाल अहमद यांचे चिरंजीव, जावई व माजी आमदार विरोध करीत आहेत. त्यांना तसा नैतिक अधिकार नाही. शहरात हद्दवाढीत विकासासाठी १४.५ कोटी रूपये शासनाने दिले होते. त्यापैकी १०.५ कोटी रूपये फक्त हिंदू बहुल भागातील हद्दवाढीच्या विकासासाठी वापरण्यात आले. तेव्हा कुठे होते समाजहित? असा टोला त्यांनी लगावला.
अन्सारी यांची बदली सुडभावनेतून नाही
मालेगाव शहर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जहीर अन्सारी यांची सुडभावनेतून बदली करण्यात आलेली नाही. विकास कामात खोडा घालणाºयांनी भेदभाव करू नये. भेदभावाचे बिजे पेरणारे कोण आहेत हे सर्वश्रुत आहेत. जहीर अन्सारी यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे मनपास आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. शहरातील अनेक भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृतरित्या नळजोडण्या करुन घेतल्या. याचा फटका बसल्याने महापालिकेस नळपट्टीच्या माध्यमातून मिळणाºया उत्पन्नास मुकावे लागत असल्याचे महापौर रशीद शेख यांनी सांगितले.

Web Title: Opposition also gave a resolution to give water to Dabhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.