विरोधक घालणार वर्षश्राद्ध; कॉँग्रेसचा काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:59 AM2017-11-08T00:59:34+5:302017-11-08T00:59:34+5:30
गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने काय साध्य झाले, फायदा झाला की तोटा याची चर्चा सुरू ंअसतानाच, नोटाबंदीचे औचित्य साधून विरोधकांनी उग्र आंदोलनांची तयारी सुरू केली आहे.
नाशिक : गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने काय साध्य झाले, फायदा झाला की तोटा याची चर्चा सुरू ंअसतानाच, नोटाबंदीचे औचित्य साधून विरोधकांनी उग्र आंदोलनांची तयारी सुरू केली आहे. बुधवारी (दि. ८) जिल्ह्यात काळा दिवस साजरा करण्याबरोबरच नोटाबंदीचे श्राद्ध आणि अन्य सर्वपक्षीय मोर्चासह आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनाही विरोधकांमध्ये सामील होऊन वर्षश्राद्ध घालणार आहे.
गेल्या वर्षी बरोबर ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. ही काळा धन आणि दहशतवादविरोधी लढाई असल्याचे जाहीर केल्याने लोकांनी त्याला पाठिंबा जाहीर केला होता. परंतु त्याचवेळी नोटाबंदीचे दुष्परिणामही भोगावे लागले. नोटाबंदीच्या कालावधीत सुमारे सव्वाशे लोकांचा देशभरात नोटा बदलण्याच्या रांगेत मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.