शेतकरी आंदोलनामागे विरोधी पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:13 AM2020-12-29T04:13:19+5:302020-12-29T04:13:19+5:30
नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्हीदेखील अनेकदा आंदोलने केली. मात्र, केंद्र शासनाने तयार केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे ...
नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्हीदेखील अनेकदा आंदोलने केली. मात्र, केंद्र शासनाने तयार केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमागे विरोधी पक्षांचेच बळ असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
नाशिकमध्ये एका कृषीविषयक कार्यक्रमास आलेले असताना पाटील बोलत होते. शेतकऱ्यांची आंदोलने असतील तर कुणी प्यायला पाणीदेखील लवकर देत नाही. मात्र, दिल्लीतील आंदोलकांना मशीनमधून रोट्या, पिझ्झा, बर्गर, टीव्ही, भारीतले टेंट तसेच अगदी जीमची उपकरणे अशी सर्व व्यवस्था कुठून आणि कशी होते? तसेच या आंदोलनांना पैसादेखील कुठून येतो, त्याबाबतही चर्चा होत असल्याचे सुजय विखे यांनी नमूद केले. विरोधकांनी एकाच व्यासपीठावर येऊन या कायद्यांतील दोषांवर चर्चा करावी. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याची केंद्र शासनाची तयारी आहे. टीव्ही आणि प्रसारमाध्यमांतून विरोध न करता आमनेसामने बसून चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे सुजय विखे पाटील यांनी नमूद केले.
-----