मालेगावमधील कोरोनाबाधित नाशिकमध्ये आणण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 10:29 PM2020-05-07T22:29:16+5:302020-05-07T23:47:37+5:30
नाशिक : मालेगावमधील कोरोनाबाधितांना नाशिक शहरात उपचारासाठी आणण्याची तयारी सुरू असून, आडगाव येथील डॉ. वसंत पवार रुग्णालय त्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मात्र, यामुळे शहरात संसर्ग वाढण्याची भीती असून, शहरातील आमदार आणि महापौर तसेच शिवसेनेच्या खासदारांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. गुरुवारी (दि.७) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांना निर्णय बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
नाशिक : मालेगावमधील कोरोनाबाधितांना नाशिक शहरात उपचारासाठी आणण्याची तयारी सुरू असून, आडगाव येथील डॉ. वसंत पवार रुग्णालय त्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मात्र, यामुळे शहरात संसर्ग वाढण्याची भीती असून, शहरातील आमदार आणि महापौर तसेच शिवसेनेच्या खासदारांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. गुरुवारी (दि.७) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांना निर्णय बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून, तो आता पाचशेच्या वर गेला आहे. नाशिक शहरात संख्या अत्यंत मर्यादित असतानादेखील गेल्या आठ ते दहा दिवसांत बाधितांची संख्या वाढून ती थेट २३ वर गेल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. विशेषत: बाहेरून आलेल्या रुग्णांमुळे स्थानिक नागरिकांना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे महापौरांनी नाशिक शहराच्या सीमेवर सीआरपीएफ जवान तैनात करण्याची मागणी यापूर्वी केली होती. मालेगाव हॉटस्पॉट असून, तेथे पाचशेहून अधिक रुग्ण झाले आहेत. मात्र, आता मालेगावमध्ये संशयित आणि बाधित रुग्णांसाठी जागा नसल्याने तेथील रु ग्ण उपचारासाठी नाशिकला आणले जात आहेत. यासंदर्भात आडगाव येथील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे या रुग्णांना उपचारासाठी आणण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील भाजप-सेनेने त्यास विरोध केला आहे. गुरुवारी (दि.७) महापौर सतीश कुलकर्णी, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मालेगावचे रु ग्ण नाशिकमध्ये आणण्यास विरोध केला आहे. नाशिकमध्ये बाधितांची संख्या मर्यादित असतानादेखील बाहेरून येणारे रुग्ण तसेच नागरिकांचा स्थानिक नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. मालेगाव येथील रुग्णांना कुठल्याही परिस्थितीत नाशिक शहरात उपचारासाठी आणू नये, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.
----------------
शिवसेनेचाही विरोध
मालेगाव येथील कोरोनाबाधितांना नाशिकमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनीदेखील विरोध केला आहे. मालेगावमधील खासगी रुग्णालये अधिग्रहीत करून तेथे उपचार करावेत तसेच गरज भासल्यास मालेगावपासून धुळे अत्यंत जवळ असल्याने त्याठिकाणी उपचारासाठी रुग्णांना पाठवावे, असे खासदार गोडसे यांनी म्हटले आहे.
--------
..मग अन्य रुग्णांचे काय करणार?
आडगाव येथील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचाराची तयारी सुरू आहे. तथापि, त्यामुळे या रुग्णालयात कोरोनाशिवाय उपचारासाठी येणाºयांचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात, यासंदर्भातील प्रस्ताव अंतिमत: मंजूर झाला नसल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
--------------
नाशिककरांच्या भूमिकेचा मालेगावकरांकडून निषेध
स्वत: ला जबाबदार म्हणवून घेणाºया नासिकच्या काही लोकप्रतिनिधींनी मालेगावचे रु ग्ण नासिकला नको अशी केलेली मागणी जितकी हास्यास्पद आहे तितकीच निषेधार्थ आहे. मालेगाव काही शत्रूराष्ट्र नाही व असेच करायचे असल्यास शासनाचा निधी कोणाच्याही मालकीचा नाही. नाशिकची लॅब एक शहराची नाही, आणि मग मालेगावच्या लोकांनी नासिकला येऊ नये असे असले तर मग नासिक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नियमितरित्या आठवड्यातील तीन दिवस मालेगावात देणार आहेत का? याचेही उत्तर संबंधितांनी द्यावे व जिल्हा प्रशासनाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी.
-अॅड. शिशिर हिरे, सामाजिक कार्यकर्ते
-----------------