वाघाड कालव्याचे पाणी पाईपलाईनने नेण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 07:26 PM2019-07-28T19:26:20+5:302019-07-28T19:26:36+5:30
दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाईपलाईनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असुन त्याबाबत मडकीजांब येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला.
दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाईपलाईनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असुन त्याबाबत मडकीजांब येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला.
वाघाड धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी केला जातो. हातनोरे, निळवंडी, पाडे, मडकीजांब, दिंडोरी, कोराटे, अक्र ाळे, मोहाडी, आंबे दिंडोरी, खतवड , जानोरी, जऊळके दिंडोरी या गावांची शेती या कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन आहे. या कालव्याची रब्बी व उन्हाळी आवर्तने शेतीसाठी वरदान ठरत असतात व द्राक्ष शेती सुदधा याच कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन आहे.
या कालव्यावर अनेक वर्षापासुन उचल व प्रवाही पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या असुन पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाची निर्मिती केलेली आहे. पाणी वापर संस्थांना त्यांच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करून पाणी पुरवण्यात येते व त्या प्रमाणात पाणीपट्टी आकारण्यात येते.
अशी परिस्थिती असतांना काही दिवसांपुर्वी वाघाड पाणी वापर महासंघाच्या बैठकीत पाणी गळतीचे कारण देत वाघाड डाव्या कालव्याचे१५ कि. मी. तसेच वाघाड उजवा कालव्याचे पाणी बंदिस्त पाईपलाईनने ४५ कि.मी. पर्यंत नेण्याचा ठराव झाल्याची माहीती शेतकºयांना समजली व त्या निर्णयाविरोधात शेतकºयांनी एकत्र येत मडकीजांब येथे बैठक घेऊन या निर्णयास कडाडून विरोध दर्शविला आहे.
यावेळी वाघाड पाणी वापर महासंघाचे अध्यक्ष तुषार वसाळ, उपाध्यक्ष मधुकर पवार, शहाजी सोमवंशी, चंद्रकांत राजे, प्रकाश वडजे, दिनकर जाधव, दत्तात्रय जाधव, दिलीप जाधव, बाळासाहेब मुरकुटे, कैलास पाटील, बाळासाहेब धुमणे, रमेश वडजे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी अंबादास पाटील, सोमनाथ बोरस्ते नरेश देशमुख आदींसह शेतकºयांनी मनोगतातून प्रस्तावित पाईपलाईन योजनेस विरोध दर्शवला.
पाणी गळती रोखण्यासाठी महासंघाने आवश्यक त्या कठोर उपाययोजना कराव्यात, संपुर्ण कॅनालचे सिमेंट काँक्र ीटीकरण करावे, अनधिकृत पाणी वापर करणाºयांवर कायदेशीर कार्यवाही करावी, प्रत्येक किलोमीटरला पाणी मोजण्याची व्यवस्था करावी व पाणी गळती थांबवावी अशा सुचना शेतकºयांनी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाºयांनी यावेळी महासंघाच्या पदाधिकाºयांना दिल्या.
या विरोधानंतरही बंदिस्त पाईपलाईनचा निर्णय घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. सभेचे सुत्रसंचालन सोमनाथ पताडे यांनी तर आभार रघुनाथ जगताप यांनी मानले. यावेळी लाभ क्षेत्रातील गावातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो २८ दिंडोरी)